शिंदे गटाच्या मंत्र्याचा थेट ठाकरेंना फोन;म्हणाले ……. !

The minister of the Shinde group directly called Thackeray; said .......!

 

 

 

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले जात असताना शिंदे गटातील एका मोठ्या मंत्र्याचा फोन आला होता. माझ्यासोबत आठ आमदार असून आम्ही मोठं बंड करत आहोत.

 

उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागून परत येतो, असं मंत्र्याने सांगितल्याचा दावा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला. आम्ही तुम्हाला माफ करु शकत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले.

 

भाजपाचे पाच प्रमुख चेहरे २०१९ नंतर आयात केलेले आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी

 

अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले. विधानसभा निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच दोन शिवसेनांमध्ये संघर्ष होत असल्यामुळे राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत.

अनेक जण पक्ष बदलतात, विचारधारा बदलतात, पण यांनी पक्ष फोडला, पक्षाचं नाव आणि चिन्हही चोरण्याचं धाडस केलं. इतकंच नाही, तर ते आजही माझ्या आजोबांचे फोटो वापरतात, तेही माझ्याच बाबांनी काढलेले, असं आदित्य म्हणाले.

 

या चोरांना आम्ही परत घेऊ शकत नाही. जे टेबलावर नाचले, ते नमुने घेऊन आम्ही जनतेसमोर कसे जाऊ? हे पुढच्या पिढीसाठी आदर्श असणार का?

 

ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कोणे एके काळी यांच्या बाजूला बसलो आणि त्यांचा प्रचार केला याची घाण वाटत असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले.

या गोष्टींना माफ करुन आम्ही त्यांना मागच्या दरवाजाने पक्षात घ्यायला लागलो तर आमच्यासोबत असलेले लोक आणि महाराष्ट्र म्हणेल की फक्त राजकारणच सुरु आहे. आम्ही राजकीय लोक नाही.

 

राजकारण करत असतो तर, यांना जाऊच दिलं नसतं. आम्ही साधी माणसं आहोत. मुख्यमंत्रीपद असो किंवा मंत्रिपद आम्ही केवळ सेवाच केली, असंही आदित्य म्हणाले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *