छगन भुजबळांचे शरद पवारासंदर्भात मोठे खळबळजनक गौप्यस्फोट

Chhagan Bhujbal's sensational secret explosion regarding Sharad Pawar

 

 

 

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रचारसभेत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या आरोपांना उत्तर देताना अनेक खळबळजनक दावे केले.

 

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला नगरसेवक, महापौर केलं. याबद्दल मी अनेकदा आभार मानले आहेत. आता शरद पवार का बोलले? मला कळत नाही.

 

शिवसेना फोडण्याचे पुण्यकर्म शरद पवार यांनी केले. मी तर 36 लोकांच्या सह्या झाल्यानंतर शेवटी गेलो. शिवसेना फोडण्याचे काम त्यांनी केले”, असा खळबळजनक दावा छगन भुजबळ यांनी केला.

 

“मी काय फोडू शकत नव्हतो. माझ्यात काहीतरी असेल म्हणून मला बाळासाहेबांनी महापौर केलं, म्हणूनच तुम्ही मला मंत्री केलं, बदनाम करण्यासाठी निवडणूकीत बोललात”, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.

 

“2004 ला मुख्यमंत्री केलं असतं, बरं मला नाही केलं, आर आर पाटील, अजित दादा यांना का नाही केलं? सुधाकरराव नाईक यांना पावरांनी मुख्यमंत्री केलं, जेव्हा ते दिल्लीला गेले होते,

 

नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात गेले होते. नाईक यांच्याशी टोकाचे मतभेद झाले तेव्हा दंगे झाले होते. नरसिंह राव यांनी परत शरद पवारांना महाराष्ट्रात पाठविले,

 

मुख्यमंत्री केल्यावर वरचढ होतात म्हणून त्यांनी ना भुजबळ, ना आर आर पाटील, ना अजित दादाला मुख्यमंत्री केलं”, असं छगन भुजबळ म्हणाले.

“शरद पवार कधीपासून भविष्य पाहायला लागले? मला काहीही दोष नसतांना तेलगी प्रकरणात उगाच गोवलं गेलं. ऑफिसरमधील वाद होते, मला राजीनामा द्यायला लावला.

 

हल्ला झाला. मला माहिती नव्हते, लोक चिडले म्हणून सांगितले. प्रफुल्ल पटेल यांनी ताबडतोब बोलून घेतले. पटेल म्हणाले, राजीनामा द्यायला पाहिजे. मी राजीनामा द्यायच्या आधी त्यांनी राजीनामा देणार म्हणून जाहीर करून टाकलं”, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला.

 

“काही घटना विचित्र वाईट घडत होत्या. मुकेश गांधी यांनी मला तेव्हा मदत केली. सुप्रीम कोर्टात गेलो. तेलगी प्रकरण 3-4 राज्यातील होतं. सीबीआयकडे प्रकरण होतं. तेव्हा वाजपेयी सरकार होते.

 

इथे माझं सरकार होतं. तेव्हा माझी मागणी होती. इथं नको तिकडे द्या सीबीआयकडे. मॅटमध्ये तक्रार गेल्यावर हे प्रकरण सांगितलं. समीर भाऊलाही बोलावलं. गाडीभर कागद गोळा झाले. पण भुजबळ नाव एकही कागदावर नव्हतं”, असा दावा भुजबळांनी केला.

 

“भुजबळचा ग्राफ चढता होता तो खाली आला. माझ्या मनात शंका होती तर बाकीचे होते. कुणालाही मुख्यमंत्री केलं नाही. सुधाकर नाईक यांचे उदाहरण डोळ्यासमोर आहेच, आज सर्व बोलणार नाही.

 

काँग्रेसचा विरोधी पक्षनेता, वन मॅन आर्मी शिवसेना-भाजप विरोधात लढत होतो. माझ्यावर प्रचंड मोठा हल्ला झाला, मी देवाच्या कृपेने वाचलो.

 

बाळासाहेब माझी टिंगल करत होते, लाखोबा म्हणाले. काही काळ मी भांडलो पण नंतर जाऊन भेटलो”, अशी आठवण छगन भुजबळ यांनी सांगितली.

 

“काँग्रेसने तुम्हाला बाजूला केलं तेव्हा भुजबळ पहिला माणूस तुमच्या बरोबर होता. कलमाडी, वासनिक होते, सगळेच मला बोलत होते जाऊ नका. पुढचा मुख्यमंत्री करणार होते.

 

पवार साहेबांसाठी मी लढलो. माझ्यावर हल्ला झाला तेव्हा ते फ्लाईटने आले होते भेटायला. मला काही दिले असेल तर मी लढलो म्हणून”, असं भुजबळ म्हणाले.

 

“आत्ताच या गोष्टी काढण्याचा काय अर्थ होता? बडे मुर्दा उखडणे चांगलं नाही. उकरायला लागलो तर बात दूरतक जाएगी. जेलमधून आल्यावर सांगत होते जाऊ नका भेटायला, तरी मी शरद पवार भेटायला गेलो.

 

कोणीही राजकारणात उचलून पद देत नाही, तो मनुष्य काहीतरी लढत असतो. अजित दादा रात्रंदिवस काम करतात म्हणून उपमुख्यमंत्री केलं ना? उमेदवार द्यायला किती चालण्या लावतात,

 

थेट काही मिळत नाही, पवार साहेबांना माझी विनंती, काही बोलू नका मला स्पष्टीकरण द्यावे लागते”, असंदेखील छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *