मत नाही दिले तर ३,००० रुपये वसूल करू”, भाजपा नेत्याची महिना दमबाजी
If you don't vote, we will charge you Rs 3,000", said the BJP leader
विधानसभा निवडणुकीत महायुतीतील सर्व पक्षांचा प्रचार हा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’भोवतीच असल्याचं पाहायला मिळत आहे.
महायुतीतील सर्व पक्ष या योजनेचा व त्या माध्यमातून महायुतीतील पक्षांचा, उमेदवारांचा व नेत्यांचा प्रचार करत आहेत. तर काही नेते या योजनेचं अमिष दाखवून, सरकार बदलल्यावर ही योजना बंद पडेल
असा प्रचार करून मतं मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच महायुतीमधील अनेक नेत्यांनी या योजनेचा प्रचार करताना वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत.
“लाडकी बहिण योजने’चे १५०० रुपये घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या प्रचारफेऱ्यांमध्ये दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या आणि ते आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करतो”,
असं वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी (९ नोव्हेंबर) रात्री कोल्हापुरात आयोजित एका प्रचारसभेत बोलताना केलं होतं. त्यापाठोपाठ महायुतीमधून आणखी एक वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून १,५०० रुपये दिलेत, धनुष्यबाणाला मत न देता इकडे तिकडे मत दिलं तर तुमच्याकडून ३,००० रुपये वसूल करू अशी तंबी कोल्हापूर भाजपाच्या महिला उपाध्यक्षा
व माजी जिल्हा परिषद सदस्या मेघाराणी जाधव यांनी दिली आहे. जाधव यांनी कोल्हापूरमध्ये एका प्रचारसभेत बोलत असताना उपस्थित महिलांना अशा प्रकारची तंबी दिल्यामुळे कोल्हापूरमधील वातावरण तापलं आहे.
मेघाराणी जाधव म्हणाल्या, “बायकांनो! माझी तुम्हा सर्व बहिणींना शपथ आहे, इथून जाताना सगळ्यांना सांगा, फक्त धनुष्यबाणाला मतदान करायचं, नाही केलं,
इकडं-तिकडं काही केलं आणि आम्हाला ते समजलं तर त्यांनी (महायुती सरकारने) १५०० रुपये दिलेत, तुमच्याकडून ३,००० रुपये वसूल करू”.
धनंजय महाडिक म्हणाले होते, “जर या ठिकाणी काँग्रेस पक्षाची रॅली निघाली आणि त्यामध्ये जर तुम्हाला महिला दिसल्या, ज्या महिला १५०० रुपये आपल्या योजनेचे घेतात,
त्यांचे फोटो काढून घ्या आणि नावं लिहून घ्या. म्हणजे घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं असं चालणार नाही. अनेक ताया महाराष्ट्रात छाती बडवत आहेत.
आम्हाला पैसे नकोत, आम्हाला सुरक्षा पाहिजे असं म्हणतात. मग पैसे नकोत का? या पैशांचं राजकारण करता? आता काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे.
काँग्रेसच्या रॅलीमध्ये महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे आणि आमच्याकडे द्यायचे, आम्ही त्यांची व्यवस्था करतो. जर कोणी मोठ्याने भाषण करायला लागली
तर एक फॉर्म द्यायचा आणि या फॉर्मवर सही कर म्हणायचं. नको आहेत ना पैसे. लगेच उद्यापासून बंद करतो म्हणायचं. लगेच बंद, आमच्याकडेही पैसे जास्त झाले नाहीत”.