पाथरी मतदारसंघाच्या विकासाच्या बळावर निवडणूक जिंकणार ;सईद खान
Saeed Khan will win the election on the strength of development of Pathri constituency

पाथरी :विठ्ठल प्रधान /7498151137
पाथरी विधानसभा मतदारसंघातील तुळजापूर, शाहापूर, आरवी, डिग्रस, कुंभारी, गोविंदपूर, आणि इस्माईलपूर या गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
गेल्या तीन वर्षांत या सर्व गावांमध्ये ग्रामस्थांना मूलभूत सुविधा मिळाव्यात या उद्देशाने आपण विविध स्वरूपाची विकासकामे केली आहेत.
असे मत सदरील गावात बोलताना पाथरी विधानसभेचे रासपाचे अधिकृत उमेदवार सईद खान यावेळी बोलताना व्यक्त केले.
या विकासकामांच्या आधारावर, आम्ही गावोगावी जाऊन जनतेशी संवाद साधत आहोत. विकासकामे आणि निष्ठेच्या जोरावर, यंदाची विकासाची लढाई आपण नक्की जिंकू
असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार सईद खान यांनी व्यक्त केला . यावेळी गावकरी, शेतकरी, आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.