अमित शहा प्रचारसभा रद्द करून तातडीने तडकाफडकी दिल्लीला रवाना ;चर्चाना उधाण
Amit Shah cancels the campaign meeting and immediately leaves for Delhi; discussions are underway
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रविवारी नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेरसह विदर्भात गडचिरोली व वर्धा या ठिकाणी जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या होत्या.
मात्र चारही सभा रद्द करुन अमित शहा तातडीने रविवारी सकाळी दिल्ली रवाना झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शहा यांचा दौरा रद्द होण्याचे कारण समजू शकले नाही
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अमित शहा यांचा १५ व १७ नोव्हेंबरला विदर्भ दौरा आयोजित करण्यात आला होता. १५ नोव्हेंबरला विदर्भात त्यांची यवतमाळ मातदार संघात उमरेखड येथे व चंद्रपूर जाहीर सभा होती .
ती झाल्यानंतर रविवारी १७ नोव्हेंबरला त्यांची गडचिरोलीसह वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काटोल व सावनेर येथे त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
अमित शहा यांचे शनिवारी रात्री नागपुरात आगमन झाले.त्यांचा खाजगी हॉटेलमध्ये मुक्काम होता. त्या ठिकाणी रात्री त्यांनी विदर्भातील काही भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
रविवारी सकाळी काटोल मतदार संघात चरणसिंह ठाकूर यांच्या प्रचारासाठी व त्यानंतर सावनेर मतदार संघात आशिष देशमुख यांच्या प्रचारासाठी सभा घेणार होते.
त्यासाठी सकाळी १०.३० वाजता निघणार होते. त्यानंतर ग़डचिरोली आणि वर्धा येथे जाहीर सभा घेणार होते मात्र रविवारी सकाळी शहा यांच्या विदर्भातील चारही सभा झाल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.
अमित शहा दिल्लीला रवाना झाल्यानुळे दिल्लीत काय घडले आहे याबाबत काहीच माहिती मिळाली नाही मात्र सकाळी १०च्या सुमारास हॉटेलमधून बाहेर पडले आणि विमानतळाकडे रवाना झाले.
जिल्ह्यात बड्या नेत्यांचा प्रचाराचा धुराळा असताना अमित शहा मात्र अचानक दिल्लीका निघाले याबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.
सावनेर व काटोलमध्ये त्शहा याच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. नागपूर जिल्ह्यातील दोन्ही सभा घेऊन ते ग़डचिरोलीला रवाना होणार होते.
मात्र तेथील सभा रद्द झाल्याने आता त्या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहाण आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या व माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सभा घेणार आहे.
काटोल व सवनेरमध्ये शिवराज सिंग चव्हाण आणि गडचिरोली व वर्धा येथे स्मृती इराणी सभा घेणार असल्याची माहिती भाजपने दिली.
अमित शहा याचा दौरा रद्द झाल्याने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यामध्ये निराशा पसरली. काटोलमध्ये सकाळी ११ वाजता सभा होती.कार्यकार्यकर्ते गर्दी जमवू लागले होते. मात्र त्याचवेळी दौरा रद्द झाल्याचा निरोप आला.भाजप नेत्यांची अ़डचण झाली आहे.