फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाजप नेत्याच्या धक्कादायक विधानाने खळबळ

BJP leader's shocking statement about Fadnavis's CM post creates a stir

 

 

 

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. त्यानंतरही भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरत नाही. त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

 

मुख्यमंत्रीपदावरून भाजप नेते अवधूत वाघ यांनी धक्कादाय ट्विट केले आहे. त्यात म्हटले की, मुख्यमंत्रीपदासाठी महाराष्ट्राची पसंती देवेंद्र फडणवीस आहेत.

 

मी आत्ताच सांगून ठेवतो, जर उलट सुलट राजकारण झाले तर १००० कार्यकर्ते स्वतःला जाळून घेतील. मी त्यातला एक असणार आहे. अवधून वाघ यांच्या या ट्विटमुळे आता खळबळ उडाली आहे.

अवधूत वाघ यांनी म्हटले की, २०१९ ला देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्याय झाला. जनसामान्यांची भावना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, ही होती. एक कार्यकर्ता म्हणून मी तीव्र शब्दात भावना लोकांपर्यंत पोहोचवली.

 

विधानसभा निवडणूक निकालाचे सर्व श्रेय फडणवीस यांना द्यावे लागेल. निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. त्यामुळेच महायुतीला हे यश मिळाले.

 

अवधूत वाघ यांनी मनसेवर टीका केली. त्यांनी म्हटले, मनसेला आपला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. त्यांनी आता ईव्हीएमवर बोलावे. त्यांना याबाबतचा कुठलाही अधिकार नाही.

 

राज्यामध्ये सरकार भाजपचे बनेल महायुतीचे बनेल आणि महाराष्ट्राचा विकास होईल. विधिमंडळाच्या नेता देवेंद्र फडणवीस यांना निवडला जाईल आणि मग नावाची घोषणा केली जाईल.

दरम्यान, संजय राऊत यांना अवधूत वाघ यांच्या ट्विटसंदर्भात विचारले. तेव्हा ते म्हणाले, अवधूत वाघ कोण आहेत मला माहीत नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत राऊत म्हणाले,

 

शिंदे ज्युनियर असूनही फडणवीस यांना ३ वर्षे त्यांच्या हाताखाली काम केले. त्यांच्याच नेतृत्वात एवढ्या जागा मिळाल्या. यामुळे भाजपचे कार्यकर्ते मागणी करत असतील त्यांना मुख्यमंत्री करा.

 

मात्र त्यांच्या पक्षात निर्णय घेण्याचा अधिकार दिल्लीला आहे. महायुतीला पूर्ण बहुमत असताना मुख्यमंत्रीपद लटकून ठेवलेला आहे. हा जनतेचा कौल नाही.

 

त्यांच्याऐवजी महाविकास आघाडीला अशी सत्ता मिळाली असती तर राज्यात राष्ट्रपती राजवट लावली असती, असे राऊत यांनी म्हटले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *