ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनच्या पडताळणीसाठी १९ जणांनी केले अर्ज
19 people applied for verification of EVM-VVPAT machines

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांनी ईव्हीएम मतमोजणीवर संशय घेतल्याने राज्यभरातील अनेक दिग्गज पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनच्या तपासणी
आणि पडताळणी संदर्भात अर्ज केले आहेत. निवडणूक आयोगाला 104 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत, ठाणे जिल्ह्यात एकूण सर्वाधिक 12 अर्ज आले आहेत.
पुण्यातील विविध विधानसभा मतदारसंघात 11 अर्ज आले अजून 137 ईव्हीएम मशीनची पडताळणी आणि तपासणीची मागणी करण्यात आली आहे. एकूण 104 उमेदवारांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या पडताळणी आणि तपासणी संदर्भात अर्ज दाखल केले आहे.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या पडताळणी आणि तपासणीच्यावेळी मशीन मधील डेटा क्लिअर करण्यात येऊन मॉक पोल घेण्यात येते.
त्यानंतर सी यु युनिटमधील डेटा आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यांच्या आकडेवारीची तपासणी केली जाते. या तपासणीद्वारे ईव्हीएम मशीनचे काम योग्य रीतीने सुरू आहे की नाही,
याची पडताळणी होते. सिंधुदुर्ग, अमरावती, वर्धा, नंदुरबार, गडचिरोली या पाच जिल्ह्यातून कुठल्याही प्रकारे ईव्हीएम मशीन पडताळणी संदर्भात अर्ज प्राप्त झालेला नाही. त्यामुळे एकूण राज्यातील 31 जिल्ह्यातील 95 विधानसभा मतदारसंघातून या संदर्भातील अर्ज प्राप्त झाले आहेत.
कोण कोण अर्ज दाखल केले?
1. राजन विचारे
2. माणिकराव ठाकरे
3. बाळासाहेब थोरात
4. राजेश टोपे
5. शशिकांत शिंदे
6. शंकरराव गडाख
7. प्राजक्त तनपुरे
8. राहुल जगताप
9. नसीम खान
10. रमेश कोरगावकर
11. क्षितीज ठाकूर
12. प्रशांत जगताप
13. राजन साळवी
14. सुनील भुसारा
15. विनोद घोसाळकर
16. दीपेश म्हात्रे
17. सुभाष भोईर
18. संदीप नाईक
19. राणी निलेश लंके
विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने 132 जागांवर विजय मिळवला. भाजपने 149 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 132 जागा जिंकून, महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला. विधानसभा निवडणुकीत भाजप,
एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना 237 जागांवर यश मिळवलं. यामध्ये भाजप 132, शिवसेना 57, राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41 आणि अपक्ष/मित्रपक्षांना 7 जागा मिळाल्या.