ईडीने जप्त केलेली अजित पवारांची मालमत्ता मुक्त

Ajit Pawar's assets seized by ED released

 

 

 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ईडीने जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने हा मोठा निर्णय दिला आहे.

 

अजित पवारांना न्यायालयाने एकीकडे दिलासा दिला आहे तर दुसरीकडे त्यांच्यावर आणि सरकारवर आता विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे.

 

शिवसेनेच्या (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. अंधारे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे.

 

या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “आयकर विभागाने जप्त केलेली अजित पवारांची मालमत्ता सहीसलामत दादांना परत केली! लोकशाही बळकट करण्यासाठी अजित पवारांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे!

 

लोकशाही बळकटीकरणाचा हा खडतर लढा भावना गवळी, यशवंत जाधव, रवींद्र वायकर, राहुल कनालसह काही चित्रविचित्र लोकांनीसुद्धा मोठ्या हिमतीने लढला होता!”

 

सुषमा अंधारे यांनी एक्सवर एक व्हिडीओ देखील जारी केला आहे. या व्हिडीओत त्यांनी म्हटलं आहे की “कालच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि

 

आज लगेचच अजित पवारांची आयकर विभागाने जप्त केलेली संपत्ती सहीसलामत त्यांना परत केली. खरं म्हणजे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी अजित पवारांनी जो अत्यंत कष्टाने लढा दिला होता त्या लढ्याला एका अर्थाने यश प्राप्त झालेलं आहे.

 

हा लोकशाही बळकटीकरणाचा, महाराष्ट्राच्या विकासाचा अत्यंत खडतर लढा याच्याआधी सुद्धा लढवला गेला आहे. भावना गवळी, यशवंत जाधव, रवींद्र वायकर, राहुल कनालसह काही चित्रविचित्र लोकांनीसुद्धा मोठ्या हिंमतीने हा लढा दिला होता!

 

या शूरवीरांनी मोठ्या ताकदीने हा पराक्रम बजावला होता. त्या सगळ्या शूरवीरांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांचा लढा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने

 

सगळ्या स्वायत्त यंत्रणांना सगळे नियम बाजूला ठेवून माणुसकीच्या भावनेतून हे निकाल लावायला मदत केली त्या भारतीय जनता पार्टीचे सुद्धा मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार सुद्धा”.

 

आयकर विभागाने ६ डिसेंबर २०२१ रोजी बेनामी मालमत्ता प्रकरणात जप्त केलेली अजित पवार यांच्या कुटुंबियांशी संबंधित मालमत्ता मुक्त केली आहे.

 

यामुळे अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार व मुलगा पार्थ पवार यांनाही दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने ७ ऑक्टोबर २०२१ रोजी अजित पवार व त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित असलेल्या काही कथित कंपन्यांवर छापे टाकले होते.

 

त्यावेळी आयकर विभागाने काही कागदपत्रे आणि मालमत्ता जप्त केल्या होत्या. पण नंतर बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक न्यायाधिकरणाने पुराव्यांअभावी आयकर विभागाचे दावे फेटाळले होते.

 

दरम्यान राज्यात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 तारखेला झाला. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली.

 

त्याच दिवशी अजित पवार यांना दिलासा देणारी बातमी आली. अजित पवार यांची आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली 1000 कोटींची मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिल्लीतील कोर्टाने काढला.

 

दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी या ऑर्डरचा संबंध अजित पवार यांच्या चार तारखेच्या पत्रकार परिषदेतील वाक्यशी सोडला आहे. यासंदर्भात ट्विट त्यांनी केले आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची एक हजार कोटींची मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली होती.

 

अजित पवार यांच्या स्पार्कलिंग सॉईल, गुरु कमोडिटी, फायर पॉवर अॅग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी सबंधित या मालमत्ता होत्या.

 

आता त्या मुक्त करण्याचे आदेश कोर्टाने 5 डिसेंबर रोजी दिले. 2021 मध्ये अजित पवार यांच्या या मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्या होत्या.

 

आता त्यांच्या या सर्व मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश मालमत्ता व्यवहार अपीलीय न्यायाधिकरणाने दिले आहेत.

 

अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पाच तारखेला शपथविधी आणि पाच तारखेला एक हजार कोटींची ऑर्डर ? ही ती ऑर्डर आहे.

 

आता मला कळले की चार तारखेला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत “मी तर शपथ घेणार”

 

असे अजित पवारांनी का म्हटले, अशी पोस्ट दमानिया यांनी X वर केली आहे. या पोस्टसोबत दमानिया यांनी कोर्टाची ऑर्डर जोडली आहे.

 

अंजली दमानिया यांनी आणखी एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये अजित पवार यांचे नाव घेतले नाही. त्यात म्हटले, शाब्बास ! १००० कोटी ? भाजपला पाठिंबा द्या,

 

उपमुख्यमंत्रिपद घ्या आणि जप्त केलेली अफाट संपत्ती, पुन्हा खिशात ? तसेच अंजली दमानिया पत्रकार परिषदही घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *