मंत्रिपद न मिळाल्याने इच्छुकांचे रुसवे फुगवे

Aspirants are upset after not getting ministerial posts

 

 

 

मंत्रिपदं न मिळाल्याने नाराज होऊन पक्षाच्या कार्यपध्दतीवर टीका करणाऱ्यांचा भविष्यात वेगळा विचार करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. काही नाराज आमदारांनी पक्षावर टीका केली आहे.

 

त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. श्रध्दा आणि सबुरी ठेवा कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. काम करणाऱ्यांचा सन्मान ठेवला जाईल . योग्यवेळी त्यांना न्याय दिला जाईल, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.

मंत्रिमंडळातून दीपक केसरकर यांना देखील वगळण्यात आले आहे. मात्र दीपक केसरकरांनी संयमी भूमिका घेतली. त्यामुळे दीपक केसरकर यांनी ज्या प्रकारे संयमी भूमिका घेतली आहे,

 

त्याचं एकनाथ शिंदे यांनी कौतुक देखील केलं आहे. तर , नाराज आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या गोटोतून सुरू असून मीडियाच्या माध्यमातून नाराजीला वाचा फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर मात्र शिंदे नाराज झाल्याचं कळतंय.

 

त्या आमदारांना या नाराजीचा फटका बसण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे श्रध्दा आणि सबुरी ठेवणाऱ्यांनाच भविष्यात शिवसेनेकडून मंत्रीपदं मिळतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

 

शिवसेनेच्या मुंबईतील एकाही आमदाराचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही. मुंबईत पालिका निवडणुका लक्षात घेता, विरोधकांना एकनाथ शिंदेंनी आयत कोलित हाती दिलं आहे.

 

मुंबईत एक तरी मंत्रीपद मिळाले असते तर ठाकरे गटाला शह देण्यास फायदा झाला असता. मागच्यावेळी दिपक केसरकरांना मुंबईचे पालकमंत्री बनवले होते.

 

मात्र त्यांनी फार अशी चमकदार कामगिरी केली नाही. त्याचा फटका लोकसभा आणि विधानसभेला बसला. त्यामुळेच यंदाच्या मंत्रिमंडळातून त्यांना वगळण्यात आले.

 

मात्र दुसरीकडे मंत्रिपदासाठी इचछुक असलेल्या प्रकाश सुर्वे यांनाही डावलल्याने तेही नाराज असल्याचे समोर आले आहे.

 

शिवसेनेकडून कोणाला मंत्रि‍पदासाठी संधी
उदय सांमत
प्रताप सरनाईक
शंभूराज देसाई
योगश कदम
आशिष जैस्वाल
भरत गोगावले
प्रकाश आबिटकर
दादा भूसे
गुलाबराव पाटील
संजय राठोड
संजय शिरसाट

आशिष जैस्वाल आणि योगेश कदम यांना राज्यमंत्री पद-

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *