महायुतीत परभणी लोकसभा कोणाकडे अद्याप गुंता कायम

There is still confusion over who has Parbhani Lok Sabha in the Grand Alliance

 

 

 

 

 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पहिली 20 जणांची उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीमध्ये भाजपकडून (BJP) पाच केंद्रीय मंत्री आणि पाच महिलांचा समावेश आहे.

 

 

 

भाजपकडून पहिल्या यादीत पाच विद्यमान खासदारांचे तिकिट कापले आहे. यामध्ये मुंबईतील दोन खासदारांचे तिकिट कापलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 25 जागांवर निवडणूक लढवली होती,

 

 

 

 

 

तर तत्कालिन एकसंध शिवसेनेनं 23 जागा लढवल्या होत्या. मात्र, शिवसेना फुटल्याने आता शिवसेनेकडून लढवण्यात आलेल्या 23 जागांवर भाजपकडून उमेदवार घोषित करण्यात आलेले नाहीत.

 

 

 

 

त्यामुळे या जागांवर सोबत आलेल्या 13 खासदारांना शिंदे गटाकडून तिकिट मिळणार का? ठाकरेंकडील खासदार असलेल्या पाच जागांवर

 

 

कोणता निर्णय होणार? अजित पवारांना एकेरीच जागा मिळणार असल्या, तरी त्या कोणत्या या प्रश्नांची उत्तरे अजून मिळालेली नाहीत.

 

 

2019 मधील जागावाटपाच्या सुत्राने पाहिल्यास भाजप अजून किमान 5 जागांवर उमेदवार जाहीर करु शकतो. मात्र, शिवसेना शिंदे गटातील फुटलेल्या सर्वच खासदारांविरोधार रोष असल्याने

 

 

 

भाजपने अंतर्गत सर्व्हेचा दाखला देत या जागांवरही दावा केला आहे. सोबत अजित पवार गटही महायुतीत आला असल्याने महायुतीची जागा वाटपाची गाडी अजूनही अडली आहे.

 

 

ठाकरेंकडील पाच खासदार आहेत त्यांच्याविरोधात मुंबईत भाजपचा उमेदवार असणार हे स्पष्ट आहे. मात्र, धाराशिव, ठाणे,

 

 

 

 

परभणीत कोणाचा उमेदवार असणार याची उत्सुकता आहे. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेच असतील, अशी चिन्हे आहेत. मात्र, मनसे महायुतीत आल्यास त्यांना कोणत्या जागा दिल्या जातील हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे.

 

 

 

शिवसेना शिंदे गटाकडे असणाऱ्या कोल्हापूर, हातकणंगले, रत्नागिरी सिंधुदुर्ग, यवतमाळ-वाशिम तसेच मुंबईमधील सहापैकी पाच जागांवर भाजपने दावा केला आहे.

 

 

 

शिंदे गटात असलेल्या गजानन किर्तीकरांच्या मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघंवारही भाजपने दावा केला आहे. केवळ राहुल शेवाळे खासदार असलेला मुंबई दक्षिण मध्य ही एकमेव जागा शिंदे गटाच्या पदरात पडू शकते, अशी शक्यता आहे.

 

 

 

मुख्यमंत्री शिंदे यांनी सोबत आलेल्या 13 खासदारांना उमेदवारीचा शब्द दिला असला, तरी अमित शाह आणि मोदींसमोर किती डाळ शिजणार? याबाबतही साशंकता आहे.

 

 

 

मुंबईमध्ये 2019 मध्ये भाजपचे तीन आणि शिवसेनेचे तीन खासदार होते. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांच्याविरोधार राहुल नार्वेकर यांची उमेदवारी निश्चित आहे.

 

 

 

मुंबई उत्तर मध्यमधून पुनम महाजन यांचा पत्ता कट करून आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा आहे. उत्तर पश्चिममधून अमित साटम यांच्या नावाची चर्चा आहे.

 

 

कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक शिवसेना शिंदे गटात असले, तरी उमेदवारीचा पत्ता कट झाल्याची चर्चा आहे. याठिकाणी भाजपकडून समरजितसिंह घाटगे आणि धनंजय महाडिक यांच्या नावाची चर्चा आहे.

 

 

 

हातकणंगले धैर्यशील माने यांचाही पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे. याठिकाणी विनय कोरे, शौमिका महाडिक, राहुल आवाडे यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.

 

 

 

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतू विनायक राऊत हे शिवसेन ठाकरे गटाचे खासदार आहेत. या जागेवरही भाजपने दावा केला असून नारायण राणे यांना रिंगणात उतरवले जाऊ शकते. याठिकाणी सुद्धा भाजपने अंतर्गत सर्व्हेचा दाखला दिला आहे.

 

 

 

 

दुसरीकडे, मावळ, शिरुर आणि बारामती जागेवरूनही वाद सुरु आहे. बारामतीची जागा अजित पवारांना सुटल्यात जमा असल्या,

 

 

 

 

तरीमावळ आणि शिरुरचे खासदार कोणत्या चिन्हावर लढणार यावरून वाद सुरुच आहे. मावळचे शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांना कमळावर रिंगणात उतरवलं जाणार का? याकडेही लक्ष आहे.

 

 

 

नाशिकमध्ये शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केल्याने वाद पेटला आहे. या जागेवरही भाजपने दावा केला आहे. पालघरमध्ये सध्या शिंदे गटाचे खासदार आहेत.

 

 

 

भाजपने विदर्भात 10 पैकी 4 जागांवर उमेदवार घोषित केले असले तरी चार जागांवरून वाद असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यासाठी भाजप इच्छूक असला तरी त्यांचा जातीचा दाखला वादात अडकला आहे.

 

 

 

दुसरीकडे विदर्भातील बुलडाणमधून प्रतापराव जाधव (शिंदे गट), रामटेकमधून कृपाल तुमाणे (शिंदे गट) आणि यवतमाळ वाशिममधून भावना गवळी (शिंदे गट) खासदार आहेत.

 

 

 

भंडारा आणि गडचिरोलीत भाजपने उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे या जागांवर काय निर्णय होणार? याची उत्सुकता आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *