फडणवीस म्हणाले;मुस्लिम व्होट बँकवर ठाकरे निवडुन आले

Fadnavis said; Thackeray was elected on the Muslim vote bank

 

 

 

 

भाजपच्या विधीमंडळांची बैठक पार पडली. बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत आपण मोदींजींना बहुमताने निवडून देत होतो त्याचा विजयात आपला सुद्धा मोलाचा वाटा होता

 

 

 

 

पण यंदा मात्र निकाल निराशजनक आल्याची सल मनात आहे असे फडणवीस कार्यकर्त्यांना म्हणाले. लोकसभेच्या निकालात मविआच्या तुलनेत भाजप आणि युतीला अल्प जागा मिळाल्याने फडणवीसांनी निराशा व्यक्त केली होती.

 

 

 

दोन दिवसांपूर्वीच फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदातुन मुक्त होण्याची इच्छा दर्शवली होती पण दिल्लीतील भेटीगाठीनंतर फडणवीसांना पुन्हा एकदा राज्यात जावून जोमाने काम करा असा सल्ला दिल्ली श्रेष्ठींनी दिल्याचे समजते.

 

 

 

राज्यात भाजपची जबाबदारी घेतलीय म्हणून अपयशाची जबाबदारी माझीच पक्ष म्हणून आणि नेतृत्व म्हणून आपण कमी पडलो अशी खंत फडणवीसांनी बोलून दाखवली.

 

 

 

माझ्या डोक्यात विधानसभेसाठी काही रणनिती सुरु आहे असा मोठा दावा यावेळी फडणवीसांनी केलाय. अगदी तीन ते चार महिन्यात राज्यात विधानसभेची निवडणुक लागली आहे.

 

 

 

लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेसाठी आता फडणवीसांनी वेगळी रणनिती आखल्याचे त्यांच्या भाषणातून दिसतंय. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना असला तरी

 

 

 

प्रत्यश्रात पवार ठाकरे विरुद्ध भाजप असेच चित्र आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला ठाकरे – पवारांना शह देण्यासाठी नवी रणनिती आखावी लागेल

 

 

 

याचाच प्लान आपल्याकडे तयार असा थेट सूचक इशाराच फडणवीसांच्या बोलण्यातून जाणवत आहे. दिल्लीत शाहांना सुद्धा रणनिती सांगितले

 

 

 

त्यामुळे आता पुन्हा जोमाने कामाला लागा असे दिल्लीतून सांगितलंय असे फडणवीस म्हणाले. त्यासह आपण का हरलो?यांची सुद्धा कारणे फडणवीसांनी कार्यकर्त्यांना वाचून दाखवली.

 

 

 

 

महाविकास आघाडीला राज्यात आपल्यापेक्षा जास्त २ लाख मतांनी पुढे आहे असे गणित फडवणीसांनी मांडलंय. पहिले कारण म्हणजे मविआ सोबत नव्हे तर खोट्या नरेटिव्हमुळे भाजपला अपयश आले अशी कबुली फडणवीसांनी दिली.

 

 

 

 

संविधान बदलणार खोट्या नरेटिव्हला आपण काऊंटर केले नाही आणि त्यांचा फटका महायुती आणि भाजपला बसला असे फडणवीसांनी कारण सांगितलंय. सामान्य माणसांमध्ये आणि दलित, अदिवासी समाजात चुकीचा नरेटिव्ह तयार झाला असे फडणवीस म्हणाले.

 

 

 

 

दुसरा नरेटिव्ह मराठा आरक्षण मविआने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नरेटिव्ह केले, पण दोन्ही वेळा मराठा आरक्षण भाजपने मिळवुन दिले

 

 

 

 

पण ज्यांनी १९८० पासून मराठा समाजाला विरोध केला त्यांचाकडे मत गेली. मराठवाड्यातील लोकसभेचा निकाल धक्कादायक लागलाय असे फडणवीसांनी मत मांडले

 

 

 

तिसरे नरेटिव्ह की भाजपने उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर नेले असा खोटा नरेटिव्ह केला पण सत्यतेत आकडेवारी मध्ये २०२२- २०२३ आणि २०२३ -२०२४ मध्ये गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे, उद्धव ठाकरेंच्या काळात गुजरात आणि कर्नाटक एक नंबरवर होते असा दावा फडणवीसांनी केलाय.

 

 

 

चौथे नरेटिव्ह उद्धव ठाकरेंना सहानुभूती पण तसे काहीच नाही कारण ठाकरेंना कोकणातून एकही जागा मिळाली नाही, मराठी माणूस ठाकरेंकडे आकर्षित नाही मुस्लिम समाजाच्या व्होट बँकवर ठाकरे निवडुन आलेत असा फडणवीसांना दावा केला आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *