बीड प्रकरणावरून धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद अडचणीत
Dhananjay Munde's ministerial post in trouble over Beed case
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मुख्य सुत्रधारांना, हत्या प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. एकीकडे बीडमधील जनता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असताना
दुसरीकडे मंत्री संजय शिरसाट यांनी आज बीडचे नवे एसपी नवनीत कॉवत यांची भेट घेऊन तपासासंदर्भात आढावा घेतला. त्यातच, मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असून
नाना पटोले यांनीही मुंडेंचा राजीनामा घ्यावा, असे म्हटले आहे. तर, जितेंद्र आव्हाड यांनी मराठा नेत्यांना, मंत्र्यांना उद्देशून लक्ष्य केलं. महाराष्ट्रात धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद काढून घ्या, अशी मागणी सर्वात पहिली मी केली आहे.
कोणतीही चौकशी केली त्याला काही अर्थ नाही. सर्व गोष्टी त्यांना अवगत होतील आणि ताकदीनिशी बाहेर पडतील. त्यामुळे देशमुख यांना न्याय द्यायचा आहे. मला आश्चर्य वाटते की,
मंत्रिमंडळात एवढे मराठा मंत्री आहेत. एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही की, धनंजय मुंडे यांचे राजीनामा घ्या असे म्हणत राज्य सरकारमधील मराठा मंत्र्यांना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष्य केलं. समाजापेक्षा मंत्रिपद महत्वाचे आहे का? असा सवालही आव्हाड यांनी विचारला आहे.
महायुती सरकारमध्ये बीड जिल्ह्याला, मुंडे कुटुंबीयांना दोन मंत्रिपदे मिळाले असून येथील सरपंच हत्याप्रकरणावरुन आता वातावरण चांगलच तापलं आहे. त्यामुळे, मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरत आहे.
त्यातच, जितेंद्र आव्हाड यांनीही मंत्रिमंडळातील मराठा नेत्यांना उद्देशून भाष्य केलं. मंत्रिमंडळात एवढे मराठा मंत्री आहेत. एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही की,
धनंजय मुंडे यांचे राजीनामा घ्या असे म्हणत राज्य सरकारमधील मराठा मंत्र्यांना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष्य केलं. तर, दुसरीकडे आमदार नरेंद्र पाटील यांनीही मुंडेंच्या राजीनाम्याची अप्रत्यक्षपणे मागणी केली आहे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कोणाला मिळेल यावर बोलताना, आम्हाला काय करायचे पालकमंत्री पदाबाबत असेही आव्हाडयांनी म्हटले. तसेच, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांचे आतमधून किती गुळपीट आहे,
हेच मला सरकारला दाखवायचा आहे, असेही आव्हाड यांनी म्हटले. मंत्रिमंडळात धनंजय मुंडे असताना वाल्मीक कराड पकडला जाईल, अशी अपेक्षा करतात तुम्ही.
पम, वाल्मिक कराडला अजून 302 चा आरोपी केला नाही. अधिवेशन संपायची वाट पाहत होते, खूप काही गोष्टी समोर येतील. पण, खूनामध्ये त्यांची भागीदारी आहे, व्यवसाय राहू द्या बाजूला, असेही आव्हाड यांनी म्हटले.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावं. नागपूर अधिवेशनामध्ये जी चर्चा झाली ते कृतीमध्ये दिसत नाही. सरपंच म्हणून देशमुख यांनी खूप चांगली भूमिका बजवली आहे.
बीडमध्ये जेवढी अनधिकृत काम चालू आहेत, ते नक्की कोणाचे आहेत हे एकदा बघितलं पाहिजे. येथे दोन नंबरचे व्यवसाय कोण करतं, डीपीडीसी बैठकीमध्ये कोणाला काम द्यायला पाहिजे हे गुंड ठरवतात,
असे म्हणत नरेंद्र पाटील यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तसेच, आम्हाला वाटतं की ह्यांना मंत्रिपद आणि पालकमंत्रीपद मिळायला नाही पाहिजे, हे मुख्यमंत्र्यांनी कृतीमध्ये आणायला पाहिजे, असेही नरेंद्र पाटील म्हणाले.
दरम्यान बीड आणि परभणी घटनेचे पडसाद राज्यभर नाही तर देशभर उमटत आहे. राज्य सरकारकडून यासंदर्भात अनेक पावले उचलली गेली आहेत.
आता या प्रकरणात मराठा क्रांती मोर्चा ही संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेची राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीत विविध मागण्या करण्यात आल्या.
तसेच 28 तारखेला मराठा क्रांती मोर्चा बीडमध्ये मोर्चा काढणार असल्याचे म्हटले आहे. उद्यापासून या मोर्च्याची तयारी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि मराठा क्रांती मोर्चाची पुढील दिशा ठरविण्यासाठी मुंबईमध्ये बैठक झाली.
बैठकी दरम्यान आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेऊ नये, अशी मागणी करण्यात आली.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मराठा समाजाकडून आर्थिक मदत करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बीडमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना सर्व समाजाला न्याय दिला पाहिजे,
अशी मागणी करण्यात आली. वाल्मिक कराड यांच्या व्यवहाराची ईडीतर्फे चौकशी झाली पाहिजे तसेच धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हालकपट्टी होत नाही. तोपर्यंत अजित पवार यांच्या प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात मराठा कार्यकर्ते निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अंकुश कदम यांनी सांगितले की, मराठा क्रांती मोर्च्याची आज राज्यस्तरीय बैठक पार पडली. मराठा क्रांती मोर्चा ज्यांनी सुरु केला होता ते सगळे आज उपस्थित आहेत.
बैठकीत विविध ठराव मांडण्यात आले. संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये,
वाल्मिक कराड यांना फाशीची शिक्षा द्यावी, धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे, या घटनेत ज्या पोलिसांचा सहभाग असेल त्यांना सहआरोपी करावे, असे ठराव करण्यात आले.
बीड जिल्ह्यात समतोल बिघडला आहे. त्या ठिकाणी एकाच जातीचे 70% पेक्षा जास्त अधिकारी आहेत. त्या ठिकाणी सर्व समाजातील नागरिकांना न्याय दिला पाहिजे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवावे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड हा
या घटनेचे खरा सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मुंडे यांना मंत्रिमंडळातून दूर करावे, अशी मागणी करण्यात आली.