बीड पोलिसांनी पाठवली अंजली दमानिया यांना नोटीस

Beed police sent notice to Anjali Damania

 

 

 

मागील काही दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण राज्यात चांगलंच गाजत आहे. या प्रकरणात राजकीय कनेक्शन्स असल्याचे आरोप होत आहेत.

 

मराठा आंदोलक मनोज जरांगे, छत्रपतींचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांच्यासह अनेक राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हे प्रकरण लावून धरलं आहे. राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनं आणि मोर्चे काढले जातायत. फरार आरोपींच्या अटकेची मागणी केली जात आहे.

 

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी फरार आरोपींबाबत मोठा गौप्यस्फोट केला. तीन फरार आरोपींचा खून झाल्याचा दावा त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर केला होता.

 

याबाबतचे काही पुरावे आपण बीडच्या एसपींना पाठवल्याचंही दमानिया यांनी सांगितलं होतं. आता याच प्रकरणावरून बीड पोलिसांनी अंजली दमानिया यांनी नोटीस पाठवली आहे.

 

अंजली दमानिया यांनी फरार आरोपींबाबत जो दावा केला आहे, त्याचे स्पष्टीकरण देण्याच्या सूचना नोटीसद्वारे करण्यात आल्या आहेत.

बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी अंजली दमानिया यांना नोटीस बजावली आहे. ज्या मोबाईल नंबरवरून व्हॉइस मेसेज आलेत,

 

तो मोबाईल नंबर, व्हॉइस मेसेज, इतर माहिती आणि पुरावे पोलिसांना द्यावेत, असं नोटीशीत म्हटलं आहे. पण ही नोटीस आल्यानंतर अंजली दमानिया यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे.

 

ज्यावेळी व्हॉट्सअॅपवर अशाप्रकारचा मेसेज आला, त्याचवेळी आपण याबाबतची माहिती आणि पुरावे बीडच्या एसपींना दिले होते. आता ते पुन्हा पुरावे का मागत आहेत? एसपींनी हे पुरावे पोलिसांना दिले नाहीत का?

 

असा सवालही दमानिया यांनी उपस्थित केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही शंका उपस्थित केली आहे.

 

तसेच पोलिसांना तपासासाठी संबंधित पुरावे हवे असतील, तर पोलिसांना सहकार्य केलं जाईल, सर्व पुरावे पोलिसांना दिले जातील, असंही दमानिया म्हणाल्या.

 

एकीकडे, फरार आरोपींची हत्या झाल्याची चर्चा सुरू असताना आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाल्याचं सांगण्यात येत आहे.

 

पोलिसांना एका आरोपीच्या फोनमधून संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचे व्हिडीओ मिळाल्याचं सांगितलं जातंय. शिवाय संतोष देशमुख

 

यांच्या हत्येच्या वेळी एका बड्या नेत्याला तब्बल 16 फोन केल्याचं देखील समोर आलं आहे. या संपूर्ण घटनेचा तपास सीआयडीकडून करण्यात येत आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *