एलॉन मस्क यांनी नाव बदलले, आता ‘हे’ आहे नवीन नाव

Elon Musk changed his name, now 'He' is the new name

 

 

टेस्ला आणि स्पेसएक्स कंपनीचे सीईओ एलॉन मस्क हे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. कधी ते त्यांच्या भन्नाट पोस्टमुळे तर कधी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर त्यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे ते चर्चेत असतात.

 

नुकत्याच संपलेल्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्यावरूनही बरीच चर्चा रंगली होती.

 

त्यामुळे एक्सवरील त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर एलॉन मस्क करत असलेल्या पोस्टकडे सगळ्यांचं लक्ष असतं. पण आता एक्सवरील त्यांचं अकाऊंट भलत्याच नावाने आपल्याला पाहायला मिळणार आहे.

 

एलॉन मस्क यांनी एक्सवरील त्यांच्या प्रोफाईलचं नाव बदललं आहे. आता त्यांच्या प्रोफाईलवर Elon Musk हे नाव बदलून Kekius Maximus असं नाव त्यांनी लिहिलं आहे.

 

त्यांनी हे नाव बदलल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये सोशल मीडियावर या नव्या नावाची तुफान चर्चा सुरू झाली आहे. हे नाव नेमकं काय आहे?

 

इथपासून त्याचा धांडोळा नेटिझन्सनी सुरू केला. यासंदर्भात करण्यात येत असलेल्या दाव्यानुसार केकियस मॅक्सिमस हे नाव क्रिप्टोकरन्सीशी निगडीत आहे.

 

एलॉन मस्क हे क्रिप्टोकरन्सीचे खूप मोठे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून किंवा जाहीर कार्यक्रमांमधून त्यांनी अनेकदा क्रिप्टोकरन्सीचा पुरस्कार केला आहे.

 

सध्याच्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये क्रिप्टोकरन्सी महत्वाची भूमिका बजावेल, असा दावाही त्यांच्याकडून अनेकदा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर एलॉन मस्क यांनी

 

त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटचं नाव बदलून Kekius Maximus ठेवल्याचं फारसं आश्चर्य वाटत नसल्याची प्रतिक्रिया नेटिझन्सकडून व्यक्त होत आहे.

 

Kekius Maximus हे नाव एका क्रिप्टोकरन्सीवरून चर्चेत आलं होतं. एका मीमवरून या क्रिप्टोकरन्सीचं नाव केकियस ठेवण्यात आलं होतं. सध्या क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये Kekius ची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

 

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, २७ डिसेंबरच्या दरानुसार अवघ्या २४ तासांत केकियसच्या दरात तब्बल ४९७.५६ टक्क्यांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

 

इतक्या मोठ्या प्रमाणावर केकियसची किंमत वाढल्यामुळे या क्रिप्टोकरन्सीची चर्चा होत आहे. त्यावरूनच एलॉन मस्क यांनी त्यांच्या प्रोफाईलवर Kekius Maximus हे नाव बदललं असावं, असा कयास त्यांच्या फॉलोअर्सकडून लावण्यात येत आहे.

 

elon musk new name on twitter x profile

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *