नोकरीचे आमिष दाखवून १७ लाखांची फसवणूक

17 lakh fraud by pretending to be a job ​

 

 

 

 

भारतीय लष्करात भरती करण्याचे प्रलोभन दाखवून १७ लाखांची फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

गंभीर बाब म्हणजे, आरोपीने दोन उमेदवारांची ठाण्यातील हॉटेलमध्ये परीक्षा घेत लवकरच त्यांना प्रशिक्षणासाठी मध्य प्रदेश आणि कर्नाटकला पाठवणार असल्याचे भासवले. मात्र, आरोपीने त्यांना नोकरीला लावले नाही. अद्याप आरोपीला अटक झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

 

विरारमध्ये राहणाऱ्या एका डॉक्टरच्या ओळखीच्या व्यक्तीकडून डॉक्टरची आरोपीशी ओळख झाली. ४९ वर्षांचा आरोपी मुलुंड येथे वास्तव्य करत असून तो मूळचा ओदिशाचा आहे.

 

 

आरोग्यविषयक वस्तूंच्या विक्रीचे काम करणाऱ्या आरोपीने भारतीय लष्करातून निवृत्त झाल्याची माहिती डॉक्टरला दिली होती.

 

त्यानंतर नेहमीच कामानिमित्त डॉक्टर आणि आरोपीची भेट होत असल्याने आरोपीने डॉक्टरला तरुणांना भारतीय लष्करात भरती करण्याचे काम करत असल्याचे सांगितले होते.

 

डॉक्टरच्या दिल्ली येथील ओळखीच्या व्यक्तीची मुलगी आणि तिचा चुलतभाऊ यांना लष्करात भरती व्हायचे असल्याने डॉक्टरने त्या व्यक्तीला आरोपीविषयी सांगितले.

 

 

काही दिवसांनी डॉक्टरची ठाण्यातील एका हॉटेलमध्ये आरोपीबरोबर भेट झाल्यानंतर आरोपीने भारतीय लष्करात भरती करण्याचे एका व्यक्तीचे नऊ लाख रुपये घेत असल्याचे सांगितले.

 

 

ही बाब डॉक्टरने दिल्लीतील व्यक्तीला सांगितल्यानंतर त्याने त्याच्या मुलीच्या आणि पुतण्याच्या भरतीसाठी १८ लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली.

 

 

सुरुवातीला चार ते पाच लाख रुपये द्यावे लागतील. नंतर उमेदवारांची परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणासाठीला पाठवले जाईल, अशी माहिती आरोपींनी दिली होती.

 

 

त्यानुसार दिल्लीच्या व्यक्तीने पाठवलेले एक लाख रुपये डॉक्टरने आरोपीला दिले. पैसे मिळाल्यानंतर आरोपीने दोन्ही उमेदवारांना दिल्लीवरून ठाण्यात परीक्षा देण्यासाठी बोलवले. २७ डिसेंबरला आरोपीने दोघांची ठाण्यातील एका हॉटेलमध्ये परीक्षा घेतली.

 

 

नंतर ही मुले पुन्हा दिल्लीला निघून गेली. आरोपीने डॉक्टरकडे उर्वरित पैसे देण्याचा तगादा लावला. डॉक्टरने त्यांच्या दिल्लीतील ओळखीच्या व्यक्तीला ही गोष्ट सांगितल्यानंतर त्यांनी डॉक्टरच्या बँक खात्यात पैसे पाठवले.

 

 

डॉक्टरने आरोपीला हे पैसे दिले. पैसे मिळाल्यानंतर दोन्ही मुले परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने लवकरच त्यांना मध्य प्रदेश आणि कर्नाटक येथे प्रशिक्षणाला पाठवावे लागेल, अन्यथा ही मुले बाद होतील, असे सांगितल्याने डॉक्टरने त्यांच्याकडील नऊ लाख रुपये आरोपीला दिले.

 

 

 

एकूण १७ लाख १० हजार रुपये उकळल्यानंतरही दोन्ही मुलांची लष्करात भरती झाली नाहीच, तसेच, आरोपी मुलुंड येथील घर सोडून निघून गेला.

 

 

त्याचा मोबाइल फोन बंद असल्याने डॉक्टर, तसेच दिल्ली येथील त्यांच्या ओळखीचे व्यक्ती आणि अन्य असे मुंबईत सैन्य दलाच्या कार्यालयात जाऊन भरतीबाबत चौकशी केल्यानंतर

 

 

कोणतीही प्रशिक्षणाची ऑर्डर काढली नसल्याचे त्यांना समजले. फसवणूक झाल्याचे कळताच डॉक्टरने दिलेल्या तक्रारीनंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *