आणखी एका आमदाराने ठाकरेंची साथ सोडली;शिंदे गटात प्रवेश
Another MLA left Thackeray's side; Shinde joined the group
राज्यासह देशात निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी हे आज
शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आमश्या पाडवी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईला पक्षप्रवेशासाठी जात असल्याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या सोशल मिडीया इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेला आहे.
त्यांच्या अधिकृत पेजवरसुद्धा हा व्हिडिओ शेअर करण्यात आल्यामुळे ते शिवसेना शिंदे गटामध्ये जाणार असल्याचं निश्चित झालं आहे.
आमश्या पाडवी हा शिवसेनेचा नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी चेहरा आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेनेत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना पक्ष तळागाळात पोहचवण्यासाठी मोठे कष्ट घेतले.
2022 साली झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी आमश्या पाडवी यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली. त्यामुळे पक्षातील इतर नेते त्यांच्यावर नाराज झाले होते.
एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर 40 आमदार त्यांच्यासोबत गेले. मात्र, पाडवी ठाकरेंच्या बाजूने उभे राहिले होते. मात्र, आज ते शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहेत.
आमदार आमश्या पाडवी यांच्यासोबत नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती गणेश पराडके तसेच जिल्ह्यातील ठाकरे गटातील अनेक मोठे चेहरे हे शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत.
येत्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या वतीने आमदार आमश्या पाडवी यांना उमेदवारी मिळणार का हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे.
महाविकास आघाडीत नंदुरबार लोकसभेची जागा काँग्रेसला सुटणार असून महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटातील
विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी हे देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांनी नंदुरबार लोकसभेसाठी तिकिटाची मागणी केली होती.
महाविकास आघाडीकडनं तिकीट मिळत नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी चेहरा म्हणून ओळख असलेल्या
आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत आज मुंबई येथे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.