छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट ;’मला मुख्यमंत्रीपदाची होती ऑफर
Chhagan Bhujbal's big revelation; 'I was offered the post of Chief Minister'

महायुती सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्याने राष्ट्रावदीचे दिग्गज नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यांनी अनेकदा उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.
अशातच छगन भुजबळ यांची भाजपसह जवळीक वाढत आहे. या सर्व राजकीय घडामोडी सुरु असताना मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती असा मोठा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे. मुलाखतीत छगन भुजबळ हा गौप्यस्फोट केला आहे.
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मी शरद पवार साहेब यांच्यासोबत होतो. त्यावेळेस काँग्रेस मध्ये जायचं की शरद पवार यांच्यासोबत रहायचे याबाबत सर्वच जण वेगवेगळे विचार करत होते.
सोनिया गांधी यांच्या ऑफिसपासून काँग्रेसचे सर्वच नेते मला काँग्रेस सोडू नका असं सांगत होते. इतकचं नाही तर मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देखील देण्यात आली होती.
मात्र, मी माझा निर्णय बदलल नाही. मी पवार साहेबांचा हात धरुन शिवसेना सोडून येथे आलो आहे असं सांगत मी शरद पवार यांची साथ सोडणार नाही असं स्पष्टपणे सांगितले.
माझा सर्व राजकीय प्रवास डोळ्यासमोर असताना मला कचऱ्यासारखं बाजूला केले जात आहे. एखादं पद मिळाले किंवा नाही मिळाले याचं काही नाही मात्र, त्यापेक्षा जी वागणूक मिळतेय ते फार वेदनादायी आहे.
मी शिवसेनेत होतो. 11 प्रमुख नेते होते. तेव्हा देखील सर्वजण एकत्र बसुन चर्चा करायचे यानंतर साहेब निर्णय जाहीर करायचे. राष्ट्रावादीत देखील शरद पवार साहेब सर्वांना बालावून चर्चा करायचे.
आता मात्र, असे चित्र पहायला मिळत नाही. कदाचित सध्याच्या पक्षात एकत्रित चर्चा करण्याची गरज वाटत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मी अनुभवी नेता असलो तरी कदाचित आता माझा अनुभव गरजेचा वाटत नसावा.
शेवटपर्यंत माझ्या नावाची मंत्रीपदासाठी शिफारस केली जात होती. सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेकजण मला मंत्रीपद द्यावे अशी आग्रही मागणी करत होते.
मी सांगितले होते की मला दोन वर्षासाठी मंत्रीपद द्यावे. मतदार संघातील परिस्थिती या आहे याबाबत मी सांगितले होते. तसेच मंत्रीपद मिळणे का गरजेचे आहे हे देखील सांगितले.
मात्र, चर्चा निष्पळ ठरली. पक्ष नेतृत्वाकडून मला अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. असं म्हणत छगन भुजबळ यांनी अजित पवार यांचे नाव न घेतला पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त केली. सध्या मी एक साधा आमदार असेही भुजबळ म्हणाले.