भारतीयांना आता या आखाती देशात मिळणार व्हिसाशिवाय प्रवेश

Indians will now have visa-free entry to the Gulf countries

 

 

 

 

इराणने गुरुवारी मोठी घोषणा केली. भारतीय नागरिकांना आता इराणमध्ये प्रवास करायचा असेल तर व्हिसाची आवश्यकता लागणार नाही.

 

 

त्यामुळे इराणमध्ये कामानिमित्त किंवा पर्यटनासाठी जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी ही आनंदाची बाब आहे. इराणने भारत आणि सौदी अरेबियासह ३३ देशांना विना व्हिसा देशात प्रवेश करण्याची संधी दिली आहे.

 

 

वृत्तसंस्था आयएसएनएनुसार, इराणच्या पर्यटन मंत्रालयाने यासंदर्भातील घोषणा केली आहे. जगातील विविध देशांशी जोडण्याची इराण सरकारची नीती यातून दिसू येते असं मंत्रालयाने म्हटलंय.

 

 

 

इराण सरकारच्या निर्णयानंतर आता एकूण ४५ देशांच्या नागरिकांना व्हिसाशिवाय इराणमध्ये जाता येणार आहे. त्यामुळे इराणकडून आंतरराष्ट्रीय संबंध वाढवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल म्हटलं जातंय.

 

 

 

वृत्तसंस्थेनुसार, लेबनॉन, ट्युनीशिया, भारत सौदी अरेबिया आणि अनेक मध्य आशियाई देश (Middle east asia) आणि मुस्लिम देश अशाप्रकारे एकूण ३३ देशातील नागरिकांना

 

 

ही सुविधा मिळणार आहे. यूरापातील क्रोएशिया हा एकमेव देश पश्चिमेतील आहे. जो युरोपीय संघ आणि नाटोचा सदस्य आहे.

 

 

इराण आणि सौदी अरेबियात अनेक दशकांपासून वाद आहे. त्यामुळे इराणने घेतलेला निर्णय दोन्ही देशांमधील वाद निवळण्यासाठी महत्त्वाचं पाऊल म्हटलं जातंय.

 

 

शिवाय हे दोन्ही देश आखातातील प्रमुख तेल उत्पादक देश आहेत. त्यामुळे इराणच्या निर्णयाला वेगळे महत्व आहे.

 

 

 

वृत्तसंस्थेनुसार, बहारीन, यूएई आणि कतार या देशांना देखील आता व्हिसाची आवश्यकता राहणार नाही. विशेष म्हणजे इराणचे या देशांसोबत अद्याप पूर्ण संबंध प्रस्थापित झालेले नाहीत. रशियाचे नागरिक समूहामध्ये असतील तरच इराणमध्ये प्रवास करु शकतील.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *