संसदेतील घुसखोरीचे कल्याण कनेक्शन ; गुप्तचर यंत्रणेची शोधमोहीम सुरू

Welfare Connection to Parliament Infiltration; The search operation of the intelligence agencies has started

 

 

 

देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या संसदेत घुसखोरी करणाऱ्या तरुणांनी फोडलेल्या रंगीत धुराच्या नळकांड्या त्यांनी कल्याणमधून खरेदी केल्याची माहिती मिळताच गुप्तचर यंत्रणेची शोधमोहीम सुरू झाली आहे.

 

 

स्थानिक पोलिस याबाबत अनभिज्ञ असून आपल्याला याबाबत कोणतीही माहिती किंवा संपर्क करण्यात आला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या निमित्ताने कल्याण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

 

 

नुकत्याच झालेल्या दिवाळी सणानिमित्त शहराच्या अनेक भागांत फटाक्यांच्या स्टॉलना परवानगी देण्यात आली होती. शिवाय अनेक विक्रेते अनधिकृतपणे फटाक्यांची विक्री करीत होते.

 

 

मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी असल्याने कमी आवाजाचे किंवा आवाजविरहित हवेत रंग उडविणाऱ्या फटाक्यांना यंदा मोठी मागणी होती.

 

 

मात्र, फटाके विक्रेते खरेदीदारांची कोणतीही नोंद ठेवत नसल्यामुळे या तरुणांनी नेमके फटाके कोणाकडून घेतले हे शोधण्याचे आव्हान गुप्तचर यंत्रणेसमोर असणार आहे.

 

 

 

संसदेत घुसखोरी केल्यानंतर पकडल्या गेलेल्या तरुणांपैकी एकाने या रंगीत धुराच्या नळकांड्या कल्याणमधून खरेदी केल्याचे सांगितल्याने आधीच गुन्हेगारीसाठी बदनाम असलेल्या कल्याण शहरावर आणखी एक शिक्का बसला आहे.

 

 

कल्याण पूर्व हे अनेक तडीपार गुन्हेगारांचे आश्रयस्थान असल्याचा अहवाल राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) असून, त्या दृष्टीने त्यांचा तपास सुरू असल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली.

 

 

दरम्यान 13 डिसेंबर 2023 रोजी संसदेत घुसखोरी करणाऱ्या आरोपींकडे कसून चौकशी सुरु आहे. त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे. अनेक खुलासे होत आहे.

 

आता याप्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. आरोपींना कोणाकडून तरी फंडिंग झाल्याचे पण समोर येत आहे. आरोपी सागर शर्मा याच्या चौकशीतून पण धक्कादायक खुलासा झाला आहे.

 

 

मनोरंजन, अमोल शिंदे, नीलम, ललित झा यांच्यासह काहींची नावे याप्रकरणात समोर आली आहे. पोलीस सखोल तपास करत आहेत.

 

 

सूत्रांच्या माहितीनुसार, सागर संसदेच्या बाहेर स्वतःला जाळून घेणार होता. जेल क्रीम खरेदीसाठी त्याने ऑनलाईन ऑर्डर दिली. पण पेमेंटमध्ये अडथळा आल्याने ऐनवेळी त्याने ही योजना रद्द केली.

 

 

त्यामुळे हा अनर्थ टळला. त्याच्या या खुलाशाने यंत्रणेला पण झटका बसला. असे झाले असते तर संसद परिसरात मोठा गोंधळ उडाला असता.

 

 

आरोपी सागर शर्मा हा इयत्ता 12वी उत्तीर्ण आहे. सैन्यात भरती होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्याने कसून प्रयत्न केले. अनेकदा प्रयत्न करुनही त्याला सैन्यात भरती होता आले नाही.

 

 

त्याचे स्वप्न भंगले. त्यानंतर तो काही दिवस बेंगळुरुमध्ये राहिला. काही महिन्यापूर्वीच तो लखनऊमध्ये परतला आणि येथे ई-रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. आता त्याचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही.

 

 

सागर शर्मा याच्या लखनऊमधील घरात पोलिसांना एक डायरी मिळाली. यामध्ये घराचा निरोप घेण्याची वेळ आल्याचे त्याने सांगितले. सागरच्या कुटुंबियांनी त्याची ही डायरी स्थानिक पोलिसांना दिली.

 

 

आता ही डायरी दिल्ली पोलिसांच्या हाती सोपविण्यात आली आहे. या डायरीत सागरने 2015 ते 2021 या काळात त्याच्या मनातील अनेक गोष्टी उतरवल्या आहेत. यामध्ये क्रांतीकारकांच्या विचारांसह काही कविता आणि विचार लिहिले आहे.

 

 

 

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सागरची चौकशी केली. त्यात त्याने संसदेबाहेर स्वतःला जाळून घेण्याच्या योजनेचा खुलासा केला. त्याने त्यासाठी एक जेल सारखी वस्तू ऑनलाईन खरेदी केल्याचे सांगितले.

 

 

हे जेल शरीराला लावल्यावर त्वचा सुरक्षित राहते. कपडे जळतात, असा त्याचा दावा होता. पण ऑनलाईन पेमेंट फेल झाल्याने त्याने ही योजना सोडून दिली.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *