आता तुमच्या हजामतीच्या खर्चावरही इन्कम टॅक्स विभागाची करडी नजर

Now the Income Tax Department is keeping a close eye on your shaving expenses too.

 

 

 

देशातील करोडो करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयकर विभाग इन्कम टॅक्स (प्राप्तिकर) चुकवणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवून असून गेल्या काही दिवसांत ज्यांनी टीडीएस जमा केला नाही,

 

त्यांच्यानंतर आता आयकर (इन्कम टॅक्स) विभाग जास्त उत्पन्न आणि खर्च कमी करणाऱ्या अनेक श्रीमंत करदात्यांवर लक्ष ठेवून आहे. असे श्रीमंत लोक दरमहा किराणा मालावर किती खर्च करतात?

 

कपडे, बूट, केस कापण्यासाठी आणि रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी तुम्ही किती खर्च करता? सगळं जाणून घेण्यासाठी आयकर विभागाने आता कंबर कसली आहे.

 

काही लोकांच्या बँक खात्यांमधून कमी पैसे काढण्यावर प्रश्न उपस्थित करत विभागाने मासिक खर्चाची चौकशी केली आहे. डेटा ॲनालिटिक्सचा वापर करून करचोरीला आळा घालण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचे सूत्रांनी म्हटले.

 

विभागाने अनेक करदात्यांना नोटिसा पाठवून त्यांच्या खर्चाची सविस्तर माहिती मागितली. पीठ, तांदूळ, मसाले, स्वयंपाकाचे तेल, गॅस, शूज, सौंदर्यप्रसाधने, शिक्षण, रेस्टॉरंटमधील जेवण आणि केस कापण्यासाठी किती पैसे खर्च झाले याची माहिती देखील देण्यासाठी इन्कम टॅक्स विभागाने सांगितले आहे.

 

आयकर तज्ञांनी म्हटले की अनेक लोकांना अशा सूचना मिळाल्या आहेत पण, फक्त काही निवडक लोकांना नोटीस पाठवण्यात आल्याचे आयकर विभागाने स्पष्ट केले.

 

या लोकांचे उत्पन्न खूप जास्त आहे पण त्या तुलनेत त्यांचा खर्च खूपच कमी आहे. म्हणजे असे काही लोक त्यांच्या उत्पन्नानुसार खर्च करत नाहीत त्यामुळे, कर अधिकाऱ्यांना यात काळा पैसा असण्याची शक्यता असल्याचा संशय आहे.

 

अशीच एक नोटीस इकॉनॉमिक टाइम्स (ईटी) च्या नजरेत आली आहे. यामध्ये, आयकर विभागाने कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती, त्यांचे प्रोफाइल, पॅन आणि वार्षिक उत्पन्नाची माहिती मागितली आहे.

 

नोटीस प्राप्त करणाऱ्या कुटुंबाने ही माहिती दिली नाही तर, त्या कुटुंबाने त्यावर्षी एक कोटी रुपये काढले आहेत असे मानले जाईल, असे विभागाने म्हटले.

 

प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, या प्रश्नांची उत्तरे फक्त अशा प्रकरणांमध्ये पाठवण्यात आली होती जिथे विभागाकडे रिटर्नमध्ये प्रत्यक्ष उत्पन्न कमी दाखवल्याबद्दल विशिष्ट माहिती होती.

 

एका अधिकाऱ्याने असेही सांगितले की असे प्रश्न फक्त काही निवडक श्रीमंत लोकांना पाठवले जात होते. दुसऱ्या कर अधिकाऱ्याने सांगितले की,

 

या सामान्य सूचना नाहीत तर विशेषतः अशा करदात्यांना पाठवण्यात आल्या आहेत जे अतिशय विलासी जीवनशैली असूनही बँक खात्यातून खूप कमी पैसे काढतात.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *