उद्या खासदार सुप्रिया सुळेंचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण

MP Supriya Sule to go on hunger strike outside the District Collector's office tomorrow

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या उद्यापासून(4 मार्च) आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान असा एक किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे या उपोषण करणार आहेत.

 

एक किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसंदर्भात पीएमआरडीए , जिल्हा परिषदकडे पाठपुरावा करून देखील काम होत नसल्याने सुप्रिया सुळे आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहे.

 

परिणामी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाचा आक्रमक पवित्रा घेत त्या आपली मागणी लावून धरणार असल्याचे सांगितलं जातंय.

 

या संदर्भात स्वत: खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्यामुळे या आंदोलनाच्या अनुषंगाने संबंधित विभागकडून नेमकं काय पाऊले उचलेले जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

बारामती लोकसभा मतदारसंघातील बनेश्वर देवस्थानाकडे जाणारा बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या साधारणतः एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे.

 

हा रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी ग्रामस्थासह मी स्वतः वारंवार जिल्हाधिकारी, पीएमआरडीए आणि जिल्हा परिषद पुणे , यांच्याकडे पाठपुरावा केला. महाशिवरात्रीपूर्वी रस्ता दुरुस्त व्हावा,

 

अन्यथा आंदोलनाचा ईशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिल्यानंतर पीएमआरडीए ने सदर रस्त्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची असल्याचे लेखी कळवले.

दरम्यान, पीएमआरडीए व जिल्हा परिषद या रस्त्याबाबत एकमेकांकडे बोट दाखवित आहेत.

 

या रस्त्याच्या निधीबाबत ठोस आश्वासन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा मी 26 फेब्रुवारी रोजी दिला होता. जिल्हा परिषद अथवा पीएमआरडीए यांच्याकडून अद्याप कुठल्याही प्रकारचे आश्वासन अथवा ठोस कृती करण्यास तयार नाही.

 

एका रस्त्यासाठी जर एवढा मोठा पाठपुरावा करण्याची वेळ ग्रामस्थांवर येत असेल तर ती शासन व प्रशासनाची असंवेदनशीलता आहे. याविरोधात मी दिलेल्या वेळेनुसार

 

उद्या दि. 4 मार्च 2025 पासून पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे, याची शासन व प्रशासनाने कृपया नोंद घ्यावी. अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळेंनी प्रशासनाला इशारा देत भाष्य केलं आहे

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *