ट्रम्प भारताचा वाट्टेल तसा अपमान करतोय पण मोदी सरकार चुप्प
Trump is insulting India as much as he wants, but the Modi government is silent

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच भारताने आयात होणाऱ्या अमेरिकन वस्तूंवरील शुल्क कमी करण्यास सहमती दर्शवल्याचा दावा केला तर,
भारत सरकारने अद्याप याबाबत कोणतीही पुष्टी केली नाही. या दरम्यान, आर्थिक थिंक टँक GTRI (ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह) ने शनिवारी म्हटले आहे की
भारताने अमेरिकेसोबतच्या सर्व वाटाघाटींमधून माघार घ्यावी. तसेच, ट्रम्प प्रशासनाला चीन आणि कॅनडासारख्या देशांसारखे वागवले पाहिजे.
ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हचे संस्थापक अजय श्रीवास्तव म्हणाले की, अमेरिकेच्या हितसंबंधांना व्यापकपणे अनुकूल असलेल्या व्यापार मागण्या मान्य करण्यासाठी अमेरिका भारतावर प्रचंड दबाव आणत आहे.
भारताने देशात आयात होणाऱ्या अमेरिकन वस्तूंवरील शुल्क कमी करण्यास सहमती दर्शविली, असा डाव ट्रम्प यांनी दावा केला. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आयात केलेल्या वस्तूंवर जास्त कर लादतो,
तिथे काहीही विकणे अत्यंत कठीण आहे, असा आरोपही ट्रम्प यांनी केला. मात्र, सरकारच्या भूमिकेवर आनंद व्यक्त करत त्यांनी सांगितले की आता भारताने शुल्क कमी करण्यास सहमती दर्शविली आहे.
GTRI संस्थापक म्हणाले की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे अधिकारी चुकीच्या डेटाचा वापर करून भारताचा सार्वजनिकरित्या अपमान करत आहेत.
अशा परिस्थितीत, कोणताही संतुलित निकाल शक्य नाही. भारताने सर्व वाटाघाटींमधून माघार घेतली पाहिजे आणि इतर देशांप्रमाणे त्यांच्याशी व्यवहार करण्याची तयारी केली पाहिजे.
टॅरिफच्या मुद्द्यावरून डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून सतत भारताला घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधी आपल्या निवडणुकीच्या प्रचारावेळीही ट्रम्प यांनी टॅरिफच्या मुद्द्यावरून भारतावर हल्ला चढवला तर,
शुक्रवारी ट्रम्प यांनी सांगितले की, भारताने अमेरिकेच्या आयातीवरील कर कमी करण्यास सहमती दर्शविली आहे कारण त्यांच्या प्रशासनाने भारताच्या धोरणांचा पर्दाफाश केला आहे.
श्रीवास्तव म्हणाले, “हे पूर्पपणे चुकीचं आहे, भारतवावर दबाव आणण्यासाठी केलं जातंय. भारताचे मौन आश्चर्यकारक आहे आणि भारताने वस्तुस्थितीसह उत्तर देणे आवश्यक असून ट्रम्प आणि त्यांचे अधिकारी दररोज भारताचा अपमान कसा करतात हे सगळं जग पाहतंय.”
भारताव्यतिरिक्त अमेरिकेने चीन, कॅनडा आणि मेक्सिको या देशांवरही टॅक्स (टॅरिफ) लादण्याची धमकी दिली. ट्रम्प यांनी चीनवर २० टक्के आणि कॅनडावर २५ टक्के कर लावण्याची घोषणा केली होती तर,
भारतावर परस्पर शुल्क आकारण्याबाबत केले. यानंतर चीन आणि कॅनडा यांनी प्रत्युत्तर टॅरिफ लादले. कॅनडाने ३० अब्ज कॅनेडियन डॉलर्सच्या यूएस आयातीवर शुल्क लादले तर
अमेरिकन उत्पादनांवर अतिरिक्त २५ टक्के अधिभार लावला. त्याचवेळी, अमेरिकेने चिनी उत्पादनांवर जितका कर लादला, तितकाच कर चीनने अमेरिकेवर लादला आहे.
भारतासोबत द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी ‘उत्पादन-दर-उत्पादन’ व्यवस्थेऐवजी अमेरिकेने एक मोठा आणि व्यापक व्यापार करार प्रस्तावित केला आहे.
GTRI च्या अहवालानुसार, एक व्यापक व्यापार करार केवळ शुल्क कपातीबाबतच नव्हे तर सरकारी खरेदी, शेती अनुदान, पेटंट कायदे आणि अनिर्बंध डेटा प्रवाहाबाबतच्या अमेरिकेच्या मागण्यांसाठी दरवाजे उघडेल, ज्याचा भारत सतत विरोध करत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी भारताच्या कर रचनेवर हल्लाबोल केला. हाय टॅरिफमुळे भारतात काहीही विकणं खूप कठीण आहे, असं ट्रम्प म्हणाले.
भारत आता आपल्या टॅरिफमध्ये कपात करण्यास तयार झाला आहे, असा दावा सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच रेसिपोकल टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे.
यात भारताच सुद्धा नाव आहे. भारताकडून द्विपक्षीय व्यापार करारावर भर दिला जात आहे. व्हाईट हाऊसमध्ये बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत टॅरिफ कमी करण्यासाठी तयार झाल्याचा दावा केला.
“भारत आमच्या वस्तुंवर मोठ्या प्रमाणात कर लावतो. भरपूर जास्त, त्यामुळे भारतात तुम्ही काही विकू शकत नाही. आता ते तयार झाले आहेत. ते आपल्या टॅरिफमध्ये कपात करणार आहेत. कारण कोणीतरी त्यांना उघडं पाडलय” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेकडून सध्या रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याची तयारी सुरु आहे. जे देश अमेरिकेच्या वस्तुंवर जास्त कर लावतात, त्या देशांच्या वस्तुंवर सुद्धा तितकाच कर लावणं म्हणजे रेसिप्रोकल टॅरिफ.
2 एप्रिलपासून लागू होणारा रेसिप्रोकल टॅरिफ हा अमेरिकेच्या व्यापार धोरणातील एक महत्त्वपूर्ण बदल असेल. डोनाल्ड ट्रम्प यांच्यानुसार भारतासह अन्य देशात मोठ्या प्रमाणात आयात कर लावून फायदा उचलला जातो, ते अमेरिका आता सहन करणार नाही.
अमेरिकी मालावर मोठ्या प्रमाणात कर लावण्याबद्दल त्यांनी कॅनडा आणि युरोपियन संघासह अनेक देशांवर टीका केली. या देशांनी अनेक वर्षांपासून अमेरिकेचा फायदा उचलला आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला. युरोपियन संघाची स्थापना ही अमेरिकेचा फायदा उचलण्यासाठी झाली आहे, असा आरोपही करण्यात आला.
मंगळवारी काँग्रेसच्या संयुक्त सत्रात केलेल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्कावरुन भारतावर निशाणा साधला होता. भारत आमच्याकडून 100 टक्क्यापेक्षा जास्त ऑटो टॅरिफ वसूल करतो, असं ट्रम्प म्हणाले होते.
त्याआधी फेब्रुवारी महिन्यात ट्रम्प यांनी कॅनडा आणि मॅक्सिकोमधून होणाऱ्या आयातीवर 25 टक्के आणि चीनमधून येणाऱ्या सामानावर 10 टक्के टॅरिफ शुल्क आकारण्याची घोषणा केली होती. भारत रेसिप्रोकल टॅरिफ ऐवजी अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करारावर भर देत आहे
अमेरिकेसोबत BTA चर्चेमध्ये काय प्रगती होते? त्यावर भारतीय अधिकाऱ्यांच लक्ष आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रंधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांनी लाभकारी व्यापार करारावर चर्चा करण्याच्या योजनेची घोषणा केली होती असं रंधीर जयस्वाल म्हणाले.