शिक्षिकेच्या घराला लागली आग त्यात १२वीच्या उत्तरपत्रिका जळून खाक;आता काय होणार विद्यार्थ्यांना चिंता

A fire broke out at a teacher's house, burning down the answer sheets of class 12th; students are worried about what will happen now

 

 

 

बारावीची बोर्डाची परीक्षा काही दिवसांपूर्वीच संपली असून अभ्यासाचं टेन्शन मानेवरून उतरल्याने विद्यार्थी काहीसे निर्धास्त होते.

 

पण रिझल्टचही टचेन्शन त्यांच्या डोक्याला आहेच की… बोर्डाची परिक्षा म्हणजे अगदी काळजीपूर्वक आणि व्यवस्थित पेपर तपासले जातात. किती मार्क मिळतील,

 

 

आवडीची फिल्ड पुढे निवडता येईल की नाही, असे एक ना अनेक प्रश्न मुलांच्या डोक्यात असतात. पण अशातच जर विद्यार्थ्यांचा बारावीचा पेपर तपासताना शिक्षकांकडून हलगर्जीपणा होत असेल तर ?

 

 

एका शिक्षिकेच्या घरात बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याने पालक आणि विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत.

 

या घटनेचा अधिक तपास विरार पोलिस करत आहेत. बोर्डाच्या परिक्षांच्या उत्तर पत्रिकांबाबत अशाप्रकारचा हलगर्जीपणा वाढत असल्याचे दिसून येत आहे.

 

नुकत्याच पार पडलेल्या १२वीच्या परिक्षेच्या चिंतेतून विद्यार्थी मुक्त झाले असतानाच, विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे टेन्शन वाढवणारी एक घटना विरार येथे घडली आहे.

 

१२वी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी घेऊन आलेल्या शिक्षिकेच्या घरात उत्तर पत्रिकांना आग लागली. विरार पश्चिम येथील गंगुबाई अपार्टमेंट, नानभाट रोड, बोळींज, आगाशी परिसरात राहणाऱ्या शिक्षिकेच्या घरी ही घटना घडली आहे.

 

या शिक्षिकेने १२ वी कॉमर्सचे पेपर रीचेकिंग साठी घरी आणले होते. या पेपरचा गठ्ठा त्यांनी सोफ्यावर ठेवला होता. काही वेळाकरिता शिक्षिकेच्या घरातील लोक बाहेर गेले. शिक्षिकेचं घर बंद असताना

 

अचानक शॉर्ट सर्किट झाला आणि आग लागली. त्यामध्ये घरातील इतर सामानासहित विद्यार्थ्यांच्या बारावी कॉमर्सच्या उत्तरपत्रिकाही जळून खाक झाल्या.

 

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच विद्यार्थी आणि पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. संतप्त पालकांनी “असे पेपर घरी आणता येतात का ?” असा सवाल उपस्थित केला आहे.

 

विद्यार्थ्यांसहीत त्यांच्या पालकांनी वर्षभर मेहनत घेतली होती. आधिच १२वी बोर्डाच्या परिक्षेमुळे विद्यार्थी आणि पालक टेन्शनमध्ये असतात. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता वाढली आहे. ही शिक्षिका कोणत्या शाळेची आहे?

 

यात कुणाचा निष्काळजीपणा आहे? पेपर जाळले की जळाले? याचा बोळींज पोलीस तपास करत आहेत. या घटनेत ज्यांचा निष्काळजीपणा असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे बोळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी सांगितले.

 

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बारावीच्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीवर लागले आहे.

 

एक शिक्षक चक्क बसमध्ये बारावीचे पेपर तपासताना दिसत असल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

 

त्यामुळे मोठी खळबळ माजलेली असतानाच आता मुंबईतीव विरारमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 

विरार मध्ये 12 वी कॉमर्स च्या तपासणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जळल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. त्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागलं आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *