ATM वरून पैसे काढणेच नाही तर बॅलन्स तपासण्यासाठीही द्यावा लागणार शुल्क

Fees will have to be paid not only for withdrawing money from ATM but also for checking the balance.

 

 

 

तुम्ही ATM चा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क वाढणार आहे. ‘पाच मोफत व्यवहार’ मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केल्यास

 

बँका ग्राहकांना आकारू शकतील अशी कमाल फी आणि एटीएम इंटरचेंज फी वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ) ने हिरवा कंदील दाखवला आहे.

यामुळे कोट्यवधी डेबिट कार्ड वापरकर्त्यांना मोठा फटका बसणार आहे. आता एटीएम वापरण्यासाठी ग्राहकांना खिसा आणखी रिकामा करावा लागणार आहे.

 

रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) एटीएम इंटरचेंज शुल्कात वाढ करण्यास मान्यता दिली आहे आणि हा नवीन नियम १ मे २०२५ पासून लागू होईल.

 

रिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवहारांवर एटीएम शुल्कात २ रुपये आणि गैर-आर्थिक व्यवहारांवर १ रुपये वाढ करण्यास मान्यता दिली आहे.

 

अशा परिस्थितीत, देशातील कोट्यवधी ग्राहकांना आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी अधिक शुल्क द्यावे लागेल. मात्र, बँकांनी अद्याप ग्राहकांवर वाढीव इंटरचेंज शुल्क लादायचे की नाही याबाबत कोणताही फैसला घेतलेला नाही मात्र, एटीएम इंटरचेंज शुल्क ग्राहकांवर लादले गेले तर त्यांच्या खिशावर आणखी भार पडेल.

 

१ मे पासून ATM व्यवहार शुल्कात इतकी वाढ होणार

रोख रक्कम काढण्यासाठी प्रति व्यवहार १७-१९ रुपये शुल्क भरावे लागेल
शिल्लक तपासण्यासाठी प्रति व्यवहार ६-७ रुपये शुल्क आकारले जाईल

 

एटीएम सेवा वापरण्यासाठी एका बँकेकडून दुसऱ्या बँकेवर ATM इंटरचेंज शुल्क आकारले जाते, जे सहसा व्यवहाराची टक्केवारी असते आणि बहुतेकदा ग्राहकांकडून देखील दिले जाते.

 

रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचा लहान बँकांवर सर्वाधिक परिणाम होईल कारण त्यांच्या मर्यादित ATM नेटवर्कमुळे ते इतर बँकांच्या एटीएमवर अधिक अवलंबून आहेत. इंटरचेंज फी वाढल्यामुळे थेट परिणाम ग्राहकांना होईल.

 

याआधी रिझर्व्ह बँकेने जून २०२१ मध्ये एटीएम इंटरचेंज फी मध्ये सुधारणा केली होती तर, यावेळी, एटीएममधून पैसे काढण्यासाठी इंटरचेंज फी १७ रुपयांवरून १९ रुपये करण्यात आली तर,

 

बॅलन्स चौकशीसारख्या बिगर-आर्थिक व्यवहारांसाठी इंटरचेंज फी ६ रुपयांवरून ७ रुपये करण्यात आली आहे. सध्या, डेबिट कार्डधारक महानगरांमध्ये इतर बँकेच्या एटीएममधून पाच व्यवहार मोफत करू शकता.

 

म्हणजे दुसऱ्या बँकेचे एटीएम पाच वेळा वापरण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही तर, बिगर-मेट्रो शहरांमध्ये ही मर्यादा तीन व्यवहारांची आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *