मराठवाड्यातील तहसीलदाराची पत्नीला मारहाण ,गुन्हा दाखल
Marathwada Tehsildar's wife beaten up, case registered

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा इथं एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तहसीलदाराने आपल्या पत्नीचा मानसिक आणि शारिरीक छळ केल्याचा आरोप आहे.
आरोपी तहसीलदाराने पत्नीला मारहाण करत थेट तिच्यावर बंदूक रोखल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी नांदेडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी तहसीलदाराला अटक केली आहे.
अविनाश शेबटवाढ असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तहसीलदाराचं नाव आहे. तो मूळचा नांदेड येथील रहिवासी असून सध्या त्याचं पोस्टिंग
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथील तहसील कार्यालयात आहे. आरोपी अविनाश शेबटवाढ याला नांदेड पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
नांदेडच्या मगनपुरा भागात माहेरी असलेल्या त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नात त्यांच्या आई-वडिलांनी सोन्या आणि इतर साहित्य देऊन चांगल्या पद्धतीने लग्न केलं होतं.
लग्नानंतर तहसीलदार पती अविनाश यांच्यासह कुटुंबियांनी त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. तसेच कर्तव्याच्या ठिकाणी सोबत असताना
वेगवेगळ्या कारणावरून मारहाण केल्याचा आरोप देखील त्यांनी केला. एवढंच नव्हे तर जीवे मारण्याच्या उद्देशाने पत्नीने आपल्यावर पिस्तूल रोखलं, असा दावाही पत्नीने केला.
या प्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरून नांदेड पोलिसांनी तहसीलदार पती अविनाश शेंबटवाढ यांच्यासह त्यांचे आईवडील आणि डॉक्टर असलेल्या दोन भावांविरुद्ध कौटुंबीक छळाचा गुन्हा दाखल केला आहे.
नांदेडच्या शिवाजीनगर पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली आहे. एका तहसीलदार पदावरील व्यक्तीने अशाप्रकारे आपल्या पत्नीचा छळ केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.