सोन्याचे दर घसरन्याला सुरुवात
Gold prices start to fall

सोन्याचे दर एक लाखांपर्यंत गेले होते. त्यानंतर मात्र आता सोन्याचे दर उतरणीला लागले होते. मंगळवारी 22 एप्रिल रोजी सोनं 1 लाखांवर गेले होते.
मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी सोनं घसरलं आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव कमी झाले आहेत. आज 22 कॅरेट सोन्याचे दर 90,000 रुपये आणि 24 कॅरेट 10ग्रॅम सोन्याचा दर 98,200 रुपयांवर व्यवहार करत आहे. चांदी 1 लाख रुपयांवर ट्रेड करत आहे. आज गुरुवारी 24 एप्रिल 2025 रोजी सोनं-चांदीचे दर काय आहेत,
गुरुवारी 24 एप्रिल 2025 रोजी चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीचे दर 1,00,900 रुपयांवर व्यवहार करत आहेत. बुधवारच्या तुलनेत चांदी आज 200 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 90,050 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 98,240 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात आज घसरण झाली आहे.
अमेरिका आणि चीन यांच्यात वाढत जाणाऱ्या व्यापारी तणाव आणि टॅक्साबाबत धोरणं यामुळं सोन्याच्या किंमतीत चढ-उतार होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं पुन्हा एकदा महाग झाले आहे.
त्यामुळं सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढील ६ महिन्यात सोन्याचे दर साधारण 75,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होऊ शकतात.
मात्र जर अमेरिका आणि चीनमधील संबंध ताणले गेले तर त्याचा परिणाम मौल्यवान धातुवर होऊ शकतो. त्यामुळं सोन्याची किंमत 1,38,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली आहे.
आतापर्यंतच्या व्यापारी सत्रात वायदे बाजारात सोन्याने पिछे मूडचा नारा दिला. सोने अवघ्या काही तासात 3,900 रुपयांनी घसरले. तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किंमती उच्चांकावर होत्या. त्यानंतर गुंतवणूकदारांनी विक्री सत्र सुरू केले.
दुसरीकडे डॉलर इंडेक्समध्ये पण वाढ दिसत आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर होत आहे. चीनच्या नवीन खेळीमुळे सुद्धा बाजारात सोन्याचे दाम घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वायदे बाजारात सोने घसरले आहे. मग खरंच सोने 55 हजार रुपयांपर्यंत घसरेल का? काय आहे ती भविष्यवाणी? केली कोणी?
मॉर्निंगस्टारच्या अहवालानुसार, काही वर्षात सोन्याच्या किंमती 55 हजार रुपयांच्या घरात येतील. अमेरिकेतील मॉर्निंगस्टारचे तज्ज्ञ जॉन मिल्स यांना आशा आहे की,
सोन्याच्या किंमती सध्याच्या स्तरावरून घसरून 1,820 डॉलर प्रति औंस होतील. त्यासाठी या अहवालात अनेक घटकांचा आणि कारणांचा उल्लेख केला आहे.
या अहवालानुसार, सोन्याचे उत्पादन वाढले आहे. 2024 मधील दुसर्या तिमाही अहवालात खाण लाभ 950 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहचला आहे. ग्लोबल रिझर्व्ह 9 टक्क्यांनी वाढून 2,16,265 टन इतका झाला आहे.
ऑस्ट्रेलियात उत्पादन वाढले आहे. तर इतर ठिकाणांहून पण सोन्याची आवक वाढली आहे. अमेरिकेतील केंद्रीय बँकेने गेल्या वर्षी 1,045 टन सोने खरेदी केले होते. वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या सर्वेनुसार,
सेंट्रल बँक सोन्याचा साठा कमी करणे अथवा आहे तो सांभाळणे अशी योजना असण्याची शक्यता आहे. या धोरणामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण दिसून येऊ शकते.
दुसरीकडे व्यापारी युद्धाला सध्या ब्रेक मिळाला आहे. तीन महिने ट्रम्प सरकारने टॅरिफ धोरणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे वायदे बाजारात जूनमधील सौदे एक लाखांचा आकडा गाठू शकणार नाहीत,
असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. देशाची राजधानी दिल्लीत सोन्याच्या किंमतींनी मंगळवारी एक लाखांचा टप्पा पार केला होता. त्यामध्ये जीएसटीचा समावेश नव्हता.
देशातील वायदे बाजारात (MCX) सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आली. बुधवारी सोने 11 वाजू 15 मिनिटांवर सोन्यात 1800 रुपयांची घसरण होऊन ते 95,536 रुपयांवर आले.
तर सकाळी सोने जवळपास एक हजार रुपयांच्या घसरणीसह 96,500 रुपयांवर उघडले. व्यापारी सत्रात सोन्याच्या किंमतीत जवळपास 1900 रुपयांच्या घसरणीसह 95,457 रुपयांच्या निम्नतम पातळीवर पोहचले. एप्रिल महिन्यात सोन्याच्या किंमतीत 4,700 रुपयांची वाढ दिसली.
मॉर्निंग स्टारच्या अहवालानुसार खरंच सोन्याच्या किंमतीत घसरण होईल का, यावर सध्या चर्चा सुरू आहे. कारण सोने सतत उसळी घेत आहे.
सोन्याने एक लाखांचा टप्पा पार केल्याने सराफा बाजारात खरेदीदारांची गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी मंदावेल आणि किंमती पुन्हा एक लाखांपेक्षा कमी होतील अशी शक्यता आहे.