फडणवीस सरकारच्या बड्या नेत्यावर 420 चा गुन्हा दाखल

A case under Section 420 has been registered against a senior leader of the Fadnavis government.

 

 

 

महायुती सरकारला आता आणखी एक धक्का बसला आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचं प्रकरण ताजं असताना आता महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.

 

विखे पाटील यांच्यासह ५३ जणांवर शेतकऱ्यांच्या नावावर बनावट कागदपत्रांच्या आधारे जवळपास 9 कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विरोधकांनी विखे पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात हा गुन्हा लोणी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. संबंधित प्रकरण २००४ सालातला आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, प्रवरा सहकारी साखर कारखान्याशी संबंधित ९ कोटी रुपयांच्या कर्ज अपहार प्रकरणी त्यांच्यासह ५४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

 

यामध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ४१५ (फसवणूक), ४२० (फसवणुकीने मालमत्ता मिळवणे), ४६४ (खोटे दस्तऐवज तयार करणे), आणि ४६५ (खोट्या दस्तऐवजांची फसवणूक) अंतर्गत कारवाई झाली आहे.

 

या प्रकरणाने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, काही राजकीय नेत्यांनी विखे पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे

 

अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले आहे की, “शेतकऱ्यांच्या नावावर पैसे उचलून स्वतःच्या खिशात घालणाऱ्या मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवणे योग्य नाही. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्वरित राजीनामा द्यावा.” अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे.

 

दरम्यान, विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरही सर्व आरोप फेटाळून लावले आहे. साखर कारखान्यात कुठलाही अपहार नाही. पैशाचा कोणताही अपहार नाही. दाखवल्या गेलेल्या बातम्या एकतर्फी आहे.

 

वस्तुस्थिती जाणून न घेता बातम्या प्रसारीत झाल्या आहेत. हे प्रकरण आजचं नाही तर 2004 पासून हे प्रकरण सुरू आहे. काही हितचिंतकांनी जाणूनबुजून 2014 पासून हे सुरू केलं.

 

या प्रकरणाची सगळ्या न्यायालयात सुनावणी झाली आहे. सगळीकडे निकाल तक्रारदारांच्या विरोधात आहे. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने क्लीनचिट दिली आहे. 2019 साली सर्वोच्च न्यायालयाने सर्व आरोपांचे खंडण करत याचिका फेटाळली आहे, असा खुलासा विखे पाटलांनी केला.

 

निवडणूक आली की असे काही मुद्दे समोर आणले जातात. आम्हाला कोणताही दणका बसला नाही. आमचेच अनेकांना दणके असतात. त्या वैफल्यातून हे सगळं चाललेलं आहे. पुन्हा चौकशी होणार असेल तर हरकत नाही.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *