बच्चू कडूंनी दिला सरकारचा पाठिंबा काढण्याचा इशारा

Bachu Kadu warned to withdraw the government's support ​

 

 

 

 

एकनाथ शिंदे यांच्या शब्दाखातर उद्धव ठाकरे यांची साथ सोडत बच्चू कडू महायुतीसोबत आले होते. मात्र आता तेच बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळता आहे. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिला आहे.

 

 

 

दिव्यांगाच्या प्रश्नावरून बच्चू कडू आक्रमक झाले आहे. दिव्यांगाना निधी न दिल्यास आम्ही तुमच्यासोबत आमदार असलो तरी ‘आपको हम भूल जायेंगे’ असं म्हणत सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. पुण्यात दिव्यांगाच्या भव्य नोकरी कार्यक्रमात बच्चू कडू बोलत होते.

 

 

 

दिव्यांगांना रोजगार मिळाला पाहिजे. दिव्यांगांचं भलं कसं होणार. नोकरी नाही तर दिव्यांगांना उद्योगासाठी काहीतरी केलं पाहिजे. यासाठी चौफेक काम करणे गरजेचं आहे. मागील ७५ वर्षांत दिव्यांगांसाठी काही खास काम झालेले नाही. अनेक गोष्टी करणे बाकी आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

 

 

मनोज जरांगेच्या मागणीने मोठा गोंधळ होईल. आई-वडील असेल तर वडिलांचा धर्म लागतो. हा मोठा चिंतेचा विषय आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी विचार करावा.

 

 

यातून मार्ग काढावा, २४ डिसेंबरच्या आत काही लोकांना आरक्षण मिळालच आहे. हे त्याच्या आंदोलनाच यश आहे. मुख्यमंत्री यांनी भूमिका घेतली आणि कुणबी प्रमाणपत्र दिली आहेत.

 

 

 

एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदार निलंबित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याचा अतिरेक होऊ नये, संसदेच बळ हे राजकीय बळ म्हणून भाजप वापरत आहे. संसदेचं बळ सामान्य माणसासाठी वापरले गेले पाहिजे. सगळ्यांना सरसकट निलंबित करणे म्हणजे उद्या तुमच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, तसे करू नये, असं बच्चू कडू यांनी म्हटलं.

 

 

 

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची आज बीडमध्ये मोठी सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली डेडलाईन उद्या संपत आहे.

 

त्यापूर्वी होणारी ही सभा अत्यंत महत्त्वाची आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला एक मिनिटाचाही वेळ देणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आजच्या सभेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

 

 

 

जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेऊ नये म्हणून प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मंगशे चिवटे यांनी सभेपूर्वी जरांगे पाटील यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

 

 

पण जरांगे यांनी आपली भूमिका सोडली नाही. विशेष म्हणजे जरांगे यांची समजूत घालण्यासाठी गेलेल्या बच्चू कडू यांनी जरांगे यांच्या उद्याच्या आंदोलनात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर बच्चू कडू यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारलाही कानपिचक्या दिल्या. सरकारने शब्द दिले होते.

 

 

त्यातील काही गोष्टी झाल्या नाही, हे दुर्देव आहे. सरकारने फसगत केली असं आंदोलकांचं म्हणणं आहे. ते साहजिकच आहे. सरकारने शब्द देताना काळजी घ्यायला हवी. आज काही झालं नाही तर आंदोलन होणारच आहे, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

 

 

काहीच फलित झालं नाही तर आंदोलन उभं राहील. आम्ही रोखा म्हटलं तरी समाज थोडी ऐकणार आहे. आंदोलन सरकारच्या सोयीचं नसतं. समाज म्हणून न्याय मिळायला हवा, असं सांगतानाच आंदोलक म्हणून मी इथेच थांबणार आहे.

 

 

 

आंदोलक म्हणून उद्या आंदोलन झालं तर उद्या आंदोलनात बसेल, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. चांगल्या गोष्टी घडत असतील तर कार्यकर्ता म्हणून मध्यस्थी करेल. तसं करणं आनंदच वाटेल, असंही त्यांनी सांगितलं.

 

 

सगेसोयरे या मुद्द्यावरून सुरू असलेल्या घोळावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सगेसोयरे या शब्दावरून माझाही गैरसमज झाला होता. सगेसोयरे म्हणजे वडिलांच्या नात्यातील लोक असा अर्थ मी घेतला होता. पण जरांगे यांचं म्हणणं वेगळं आहे.

 

 

 

आईच्या जातीचं सर्टिफिकेट मुलाला मिळावं, अशी त्याांची मागणी आहे. तसं झालं तर आईची जात एका मुलाला आणि बापाची जात दुसऱ्या मुलाला लागेल. त्यामुळे एकाच कुटुंबात दोन जाती तयार होतील, असं बच्चू कडू म्हणाले.

 

 

 

सोयरे म्हणजे सोयरीक. जिथे सोयरीक होईल असं नातं. तेल्यांची तेल्यांसोबत सोयरीक होते. माळ्यांची माळ्यांसोबत सोयरीक होते, कुणबीची कुणब्यासोबत सोयरीक होते, ही सोयरीक.

 

 

 

म्हणून आईची जात पोराला लावू शकत नाही. काका, पुतण्या, मामा, मावशी हा सगेसोयरेचा अर्थ आहे. आधी सगेसोयऱ्याची व्याख्या करणं गरजेचं आहे. व्याख्या झाली तर सर्व स्पष्ट होईल, असंही त्यांनी सांगितलं.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *