शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, पालकांचं टेन्शन वाढलं

Students in the school are infected with Corona, the tension of the parents increased ​

 

 

 

 

वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. अहमदनगरमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

 

 

 

शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्याच्या आरोग्य यंत्रणेची झोप उडवणारी ही अपडेट आहे.

 

 

 

अहमदनगर तालुक्यातील दोन विद्यार्थी कोरोना बाधित आढळले आहेत. तीन दिवसांपूर्वी या विद्यार्थ्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती. तपासणीत विद्यार्थी कोरोना बाधित आढळले आहेत.

 

 

 

विद्यार्थ्यांमध्ये माइल्ड सिमटम्स असल्याने कोणताही धोका नाही. सर्दी – खोकला असल्याने या विद्यार्थ्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती.

 

 

 

नाशिक शहरात कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचे तीन रुग्ण आढळले आहेत. एकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, दोन जण होम क्वारंटाईन आहेत.

 

 

 

तर, इतर 200 जणांच्या अँटिजन चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला कोरोनाचे रुग्ण आढळले आले होते. मनपा आरोग्य विभाग सतर्क झाला असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *