निकालाच्या पूर्वी , शिंदे गटाच्या आमदाराचं धक्कादायक विधान

Before the result, the shocking statement of the Shinde group MLA ​

 

 

 

 

 

आज राज्यातील राजकारणातला ऐतिहासिक निर्णय लागणार आहे. शिवसेना पक्षातील कुठला गट अपात्र होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचा लक्ष लगालं आहे.

 

 

शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून निकाल आपल्या बाजूने लागणार असा दावा करण्यात येत आहे. अशातच शिंगे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे.

 

 

 

महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन सज्ज आहे. त्यामुळे निकालानंतर याबाबत कोणी काहीही म्हणत असेल तर पोलीस त्यांना रट्टे देऊन मोकळं करतील.

 

 

त्यामुळे गुपचूप बसा नाही तर मग पाठीला तेल लावून बसा, असं खळबळजनक विधान आमदार संतोष बांगर यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. तसेच निकाल आमच्याच बाजूने लागणार असा दावाही त्यांनी केलाय.

 

 

आमदार अपात्रतेबाबत निकालाचे वाचन सुरू होण्यास आता काही तास शिल्लक आहे. निकाल आपल्याच बाजूने लागणार असा दावा शिंदे गटातील आमदार करत आहेत.

 

 

ठाकरे गटाविरोधात निकाल लागल्यास त्यांच्याकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे संतोष बांगर यांनी थेट पोलीस त्यांना रट्टे देऊन मोकळं करतील, असं धक्कादायक विधान केलं आहे.

 

 

 

सुनावणीनंतर निकालावरून शिंदे आणि ठाकरे गटातून प्रतिक्रिया उमटतील. यावेळी कुठलीही अनुचित घटना घडूनये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू नये म्हणून मुंबईतील विविध भागात

 

 

पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान मुंबईतील मंत्रालय परिसरात मुंबई पोलीस वाहतूक पोलीस राखीव दल अशी विविध पथक परिसरात तैनात करण्यात आली आहेत.

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी निकाल आमच्याच बाजूने लागणार आणि जल्लोष आम्हीच करणार असा विश्वास व्यक्त केलाय.

 

 

विरोधकांकडून कितीही प्रचार करण्यात आला तरी त्यांचा असुरी आनंद आहे. त्यांनी कितीही देव पाण्यात ठेवले तरी निर्णय आमच्याच बाजूने लागणार आणि जल्लोष देखील आम्हीच करणार असा टोला भोईर यांनी विरोधकांनी लगावला आहे.

 

 

दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांची ‘नार्को टेस्ट’ करण्याची खळबळजनक मागणी अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केलीये.

 

 

 

त्याला आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलंय. ठाकरे गटाला निकाल लक्षात आलाय. त्यामुळे ते अकलेचे तारे तोडत आहेत असं प्रत्युत्तर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिलंय.

 

 

नितीन देशमुख म्हणाले, निकाल आधीच ठरलेला आहे. भाजपनं सांगितला तसा विधानसभा अध्यक्ष देतील. जर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची ‘नार्को टेस्ट’ केली तर यातील सर्व सत्य बाहेर येईल.

 

 

 

जे गद्दार आहेत त्यांना आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर रात्री झोप आली नसेल. आम्ही निर्धास्त झोपलो. आम्हाला निकालाची चिंता नाहीय. निकाल काहीही लागला तरी आमचा जनतेवर विश्वास आहे.

 

 

 

आमदार अपात्रता निकाल दोन दिवसांपूर्वीच ठरला आहे. निकाल आमच्याविरोधात लागणार हे आत्ताच कळलंय, त्यामुळेआता निकालाबाबत उत्सुक नाही.

 

 

मला आत्ताच मंत्रालयात शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे असो दोन आमदार भेटले त्यांनी खात्रीपूर्वक सांगितलंय की, निकाल आमच्याविरोधात जाणार आहे. निकाल आमच्या विरोधात गेला तर पुन्हा न्यायालयात जाऊ, असे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक म्हणाले.

 

 

 

आम्ही आणखी ताकदीने जिल्ह्यातून आणि राज्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणत उद्धवसाहेबांचे हात मजबूत करू. निकाल देणारे न्यायाधीश नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटतात, यातच सारं आलं. आमचा देव असलेल्या बाळासाहेबांचा आशिर्वाद आमच्या पाठीशी आहे, असे नितीन देशमुख म्हणाले.

 

 

 

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नार्को टेस्ट करण्यात यावी अशी अजब मागणी केल्याने वाद निर्माण झाला आहे

 

 

 

यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पलटवार केला नितीन देशमुखांच्या मागणीवर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, ठाकरे गटाला कळून चुकलं आहे की आपला निकाल लागला आहे. त्यामुळे हे असे अकलेचे तारे तोडत आहेत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *