उद्धव ठाकरेंकडून अजितदादांना धक्का

Uddhav Thackeray shocks Ajit Dada

 

 

 

 

 

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातच अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. मावळनंतर आता शिरुर लोकसभा मतदारसंघात मोठा मोहरा गळाला लागला आहे.

 

 

 

अजितदादांच्या समर्थक नेत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. अजित पवार यांचे खंदे समर्थक डॉ. शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.

 

 

 

शैलेश मोहिते यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन हाती बांधून घेतलं. समर्थांसह मोहिते यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. तळेगावमध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शैलेश मोहितेंचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला आहे.

 

 

 

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खेड, राजगुरूनगरमध्ये त्यांनी धक्का दिलाय. आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे शैलेश मोहितेंना ठाकरेंनी शिवबंधनात बांधून घेतलं आहे.

 

 

 

तळेगावमध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शैलेश मोहितेंचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला. यापूर्वी पिंपरी चिंचवड मधील अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी महापौर संजोग वाघेरेंना ही उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे खेचलं होतं.

 

 

मावळ लोकसभेत वाघरेंच्या रूपाने तर आता शिरूर लोकसभेत शैलेश मोहितेंच्या रूपाने ठाकरेंनी अजित पवारांना धक्के दिलेत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *