जरांगेंचा नारायण राणेंना निर्वाणीचा इशारा

Jarang's warning of Nirvani to Narayan Rane

 

 

 

राज्याच्या राजकारणात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या टार्गेटवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायम राहिलेत.

 

 

त्यांना उत्तर देण्यासाठी भाजपचे प्रमुख नेते पुढे सरसावतात. यावेळी आणखी एक भाजपचे ज्येष्ठ नेते थेट जरांगेंच्या निशाण्यावर आहे. फडणवीसांना मोठं करण्यासाठी माझ्या समाजाचं वाटोळं करू नका,

 

असे म्हणत मनोज जरांगेंनी भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. मला धमकी देऊ नका, मी गोरगरिबांसाठी काम करतो, असेही जरांगे यावेळी म्हणाले.

 

 

मनोज जरांगे म्हणाले, फडणवीसांना मोठं करण्यासाठी माझ्या समाजाचं वाटोळं करू नका. नारायण राणेंनी मराठा समाजाच्या बाजूने बोलावं. मला धमकी देऊ नका, मी गोरगरिबांसाठी काम करतो.

 

 

राणे कुटुंबियांबद्दल मी काहीच बोललो नाही, देवेंद्र फडणवीस यांच ऐकून ते मला बोलत आहेत, तुम्ही देवेंद्र फडणवीसची सुपारी घेतली. मी देवेंद्र फडणवीसला मोजत नाही. मराठा समाजाने चांगले चांगले पाया खाली चिरडले आहेत, तुम्ही कोण आहात?

 

नारायण राणेंवर मनोज जरांगे म्हणाले, तो काहीही बरळत आहे. आम्ही कोणाचे उपकार विसरत नाही. त्यांना मला धमकी देण्याची काही गरज नाही. मी गोरगरिबांसाठी काम करतो आहे.

 

तुम्ही देवेंद्र फडणवीसला मोठ करण्यासाठी माझ्या समाजाच वाटोळं करू नका.. मी नारायण राणे यांचा सन्मान करतो…मी मराठा समाजाचे काम करतो म्हणून तुम्ही मला धमक्या देत आहेत.

 

मनोज जरांगेंनी फडणवीसांवर टीका करायची आणि त्या टीकेला भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर द्यायचं. आरक्षणाच्या मुद्द्यावरचा हा राजकीय सवाल-जवाब महाराष्ट्राला आता नवीन नाही.

 

मात्र जरांगेंना जवाब देण्यासाठी आणि प्रश्न विचारण्यासाठी भाजपचा नारायण राणेंच्या रुपाने एक चेहरा पुढे सरसावलाय. गणपतीनंतर जरांगेंना जाब विचारण्यासाठी नारायण राणे मराठवाड्याचा दौरा करणार आहेत.

 

 

जरांगेंनी देखील राणेंचं आव्हान स्वीकारत त्यांना इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांवर बोलू नये असं नारायण राणेंनी म्हटलंय. भाजप नेत्यांची बाजू घेत राणेंनी जरांगेंवर हल्लाबोल केलाय..

 

याला जरांगेंनीही प्रत्युत्तर दिलंय.. धमकी देण्यासाठी नारायण राणेंना फडणवीसांनी सांगितलं का? असा सवाल जरांगेंनी विचारलाय. निलेश राणेंनी नारायण राणेंना समजावून सांगावं असंही जरांगे म्हणाले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *