लोकसभा निवडणूक;मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केले हे आवाहन
Lok Sabha Election: Manoj Jarange appealed to the Maratha community
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी लोकसभेत कुठेही अपक्ष उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत कुणालाही पाठींबा नाही ज्यांना पाडायचं त्यांना पाडा, असं देखील जरांगेंनी स्पष्ट केले.
कुठेही प्रचाराला जाणार नाही, लोकांचं उलट आहे आपलं उलट आहे. लोक मतं मागायला जातात पण आपल्याडे आधी मतं आहेत.
मराठ्यांची परिस्थिती आता पहिल्यासारखी राहिली नाही. कोणताही उमेदवारी देणार नाही, पाठिंबा देणार नाही. आता मराठा समाजाने निर्णय घ्यावा, असे मनोज जरांगे म्हणाले.
वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, वसंत मोरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. त्यामुळे मनोज जरांगेंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं होते.
प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे नवीन आघाडी करणार अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र आता जरांगे राजकारणापासून दूर राहणार हे स्पष्ट झालं आहे.
मराठा समाजाने निवडणुकीत पडण्याची गरज नाही. गावागावातून आलेल्या अहवालातून अपक्ष उमेदवार देता येणार नाही. मात्र तुम्हाला ज्यांना पाडायचं आहे त्यांना पाडा, असे आवाहन जरांगे यांनी केले.
मनोज जरांगे म्हणाले, मी खूप साधारण माणूस आहे. मला राजकारण कळत नाही. मी राजकारणात असलो काय नसलो काय
माझ्यात आरक्षण मिळवून देण्याचा दम आहे. लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार नाही. जो सगेसोयरे कायद्याला विरोध करेल त्याला पाडा.