VIDEO; नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; भाजपने दिला पाठिंबा
Nitish Kumar's resignation as Chief Minister; BJP gave support
नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. तसेच भारतीय जनता पक्षाने त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपसोबत मिळून जेडीयू सरकार स्थापन करेल हे आता स्पष्ट झालं आहे.
गेल्या काही दिवसांपासून बिहारच्या राजकारणात उलथापालथीचे संकेत मिळाले होते. त्यानुसार आज मोठा बदल पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी नितीश कुमार हे इंडिया आघाडीसोबत होते. भाजपला हरवण्यासाठी इंडिया आघाडी एकत्र आली होती. पण,
दरम्यान आता इंडिया आघाडीतील महत्वाचा पक्ष जेडीयू पुन्हा भाजपसोबत जात आहे. त्यामुळे इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का आहे. दुसरीकडे, नितीश कुमार यांनी पलटू कुमार अशी आपली प्रतिमा कायम ठेवल्याची चर्चा सुरु झाली आहे.
नितीश कुमार हे एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांदरम्यान हा बिहारचे राजकारण चांगलेच तापले आहे. पाटणा शहरात सध्या राजकीय हालचालींना वेग आलेल्या असताना नितीश कुमार यांचा एक जुना व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये नितीश कुमार मी मरण पत्करेन पण मला एनडीएमध्ये सहभागी होणं मान्य नाही असे म्हणताना दिसत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी हा व्हिडीओ शेअर करत नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे.
नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार अशा चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी हा व्हिडीओ शेअर करत त्यांना ‘पलटू राम’ म्हणत प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल होत आहे.
समाजवादी पक्षाचे नेते राजीव राय यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे, ते म्हणाले की “तुम्ही दीर्घायुष्य व्हावे अशी आमची सर्वांची इच्छा आहे, तुम्ही देशाचे महान नेते आहात.
तुम्ही आम्हा सगळ्यांना आशा आहे की भाजपविरोधात शपथ घेतली होती ती आपल्या सगळ्यांना मिळून पुर्ण करायची आहे. तुम्ही इंडिया आघाडीचे जनक आहात आणि तुम्ही पुन्हा पलटी माराल तर जनतेला काय वाटेल?”
2023 मध्ये नितीश कुमार म्हणाले होते, “मी मृत्यू पत्करेन, पण त्यांच्याबरोबर (एनडीए) जाणं मला मान्य नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही असं समजा की या सगळ्या बोगस चर्चा आहेत. त्यांनी काही कराण नसताना किती गोष्टी केल्या होत्या.”
1994 मध्ये नितीश कुमार यांनी जनता दल सोडले आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पक्षाची स्थापना केली. त्यानंतर 1996 मध्ये नितीश भाजपमध्ये दाखल झाले
माननीय @NitishKumar जी हम सब चाहते हैं कि आपकी लम्बी उम्र हो,आप देश के बड़े नेता है,
आप से हम सबको उम्मीद है कि भाजपा के खिलाफ आपने प्रतिज्ञा किया था उसको हम सब मिलकर पूरा करेंगे,
INDIA गठबंधन के जनक है आप , अगर फिर पलटी मारेंगे तो जनता क्या सोचेगी ?????@Jduonline pic.twitter.com/j76gz4qraZ
— Rajeev Rai (@RajeevRai) January 27, 2024
आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री झाले. त्यानंतर 2003 मध्ये नितीश कुमार यांनी जनता दलासोबत समता पक्षाची युती करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर 2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार बनले तेव्हा त्यांच्या विरोधासाठी त्यांनी एनडीए सोबतची 17 वर्षे जुनी युती तोडली.
2015 च्या निवडणुकीत त्यांनी राजद आणि काँग्रेससोबत युती केली. जी त्यांनी 2017 मध्ये तोडली आणि एनडीएमध्ये सामील झाले.