चोरी करायला चक्क विमानाने जायचे अन चोरी करायचे, टोळीत पोलीस कर्मचारीसुद्धा
They used to go by plane to steal and steal, even policemen were in the gang

परराज्यात विमान प्रवासाने जाऊन चारचाकी वाहन चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आले आहे.
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. यामध्ये जवळपास 1 कोटी ५७ लाख रुपये किमतीची 11 चार चाकी वाहन जप्त करण्यात आली आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडाविरोधी कार चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे कार चोरणाऱ्या टोळीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याही समावेश असल्याचे उघड झाले आहे. भरत खोडकर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहे.
तर अजीम सलीम पठाण हा या कार चोरी करणाऱ्या टोळीचा मोरक्या आहे. अजीम पठाण हा विमान प्रवासाने दिल्ली,मध्यप्रदेश या राज्यात जाऊन काही सहकारांच्या मदतीने चार चाकी वाहन चोरी करायचा.
चोरी केलेली चार चाकी वाहन तो महाराष्ट्रात आणून कमी किमतीत काही लोकांना विकत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी अजीम सलीम पठाण, शशिकांत प्रताप काकडे, राजाराम उर्फ राजू तुकाराम खेडेकर, महेश भीमाशंकर सासवे, प्रशांत माने,
विकास माने, भारत खोडकर, हाफिज, इलियास आणि रसूल शेख या दहा आरोपींना दरोडा विरोधी पोलीस पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.