काँग्रेसचा मोठा नेता महायुतीत जाणार ,केले सूचक वक्तव्य
A big leader of Congress will join the Grand Alliance, made an indicative statement
मुंबई काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते आणि वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून तीनवेळा आमदार राहिलेले बाबा सिद्दीकी अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे.
बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना उधाण आले. त्यामुळे मिलिंद देवरा यांच्यानंतर
पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात होता. परंतु, मी सध्या काँग्रेसमध्येच असून भविष्यात कुठे जाईन हे सांगता येणार नाही, असी प्रतिक्रिय बाबा सिद्दीकी यांनी दिली.
बाबा सिद्दीकी म्हणाले, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचं मी कौतुक करतो कारण मी त्या सर्वांबरोबर काम केलं आहे.
अजित पवार असं व्यक्तिमत्त्व आहे ज्यांचं काम सकाळी साडेसहा वाजता सुरू होतं. रात्रभर ते काम करतात. अजित पवार वर्कहोलिक आहेत.
“आमदारांसाठी किंवा जे पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत त्यांच्या केबिनमध्येही अजित पवार येतात. कारण त्यांना त्यांच्या आमदारांचं काम होणं गरजेचं वाटतं.
कधीकधी आम्हाला असं वाटतं की आमचंच नशीब खराब आहे की आम्हाला असा नेता मिळाला नाही. एक माणसू म्हणून ते वर्कहोलिक आहेत, असं मीच नाहीतर सगळेच असं म्हणतात”, असंही ते म्हणाले.
तसंच, काँग्रेस सोडून अजित पवार गटात जाण्याच्या चर्चांवर बाबा सिद्दीकी म्हणाले की, मी सध्या काँग्रसमध्ये आहे. भविष्यात कोण कुठे जाईल हे सांगता येत नाही.
जेव्हा मी अजित पवार गटात जाईन तेव्हा मी सर्वांना सांगून जाईन. जर नाही गेलो तर नाही सांगणार, अंसही ते पुढे म्हणाले.
दरम्यान, अजित पवारांनी बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे मिलिंद देवरा यांच्यानंतर बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकीही अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी आणि त्यांचे पूत्र झिशान सिद्दीकी अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. ही पिता-पुत्र जोडी येत्या १० फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करेल, असा दावा काही वृत्तवाहिन्यांनी केला आहे.
सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम केला तर मुंबई काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल. झिशान आणि बाबा सिद्दीकी यांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली होती.
या भेटीतच त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत बोलणी झाली असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, यावर आमदार झिशान सिद्दीकी यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टीकरण दिलं.
झिशान सिद्दीकी म्हणाले, मी कुठल्याही पक्षात प्रवेश करत नाहीये. मी काँग्रेसमध्येच आहे. मी आणि माझ्या वडिलांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली होती. त्या भेटीबाबतचं वृत्त खरं आहे.
परंतु, ती एक कौटुंबिक भेट होती. त्या भेटीत आम्ही राजकीय चर्चा केली नाही. आम्ही अधून-मधून अजित पवारांना भेटत असतो. मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की, मी कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही.
अजित पवारांचं कौतुक करत झिशान सिद्दीकी म्हणाले, अजित पवारांसाठी मी मुलासारखा आहे. आमचे कौटुंबिक संबंध आहेत. माझ्यावर अन्याय होत होता, तेव्हा अजित पवारांनी माला साथ दिली, माझ्या पाठिशी उभे राहिले.
अजित पवार असे नेते आहेत जे कायम तरुणांच्या पाठिशी उभे राहतात. कुठल्याही पक्षातील आमदारांसाठी रात्री २ वाजता आणि सकाळी ६ वाजतादेखील ते उपलब्ध असतात. असा दुसरा कुठलाही नेता उपलब्ध नसतो. ते खूप प्रेरणादायी आहेत.
तुमच्या वडिलांनी अजित पवार गटात प्रवेश केला तर तुमची भूमिका काय असेल? असा प्रश्न विचारल्यावर झिशान सिद्दीकी म्हणाले, मी काँग्रेसमध्ये आहे
आणि काँग्रेसमध्येच राहीन. परंतु, मी वडिलांबाबत भविष्यवाणी करू शकत नाही. काँग्रेस सोडून इतर कुठेही जाण्याचा माझा विचार नाही.