नारायण राणेंना राज्यसभेची उमेदवार नाही ?मंत्र्यांचे मोठे विधान

Narayan Rane is not a Rajya Sabha candidate? Minister's big statement ​

 

 

 

 

 

राज्यसभा खासदारांना लोकसभेत पाठविण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे. कदाचित केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुद्धा लोकसभेचं तिकीट देण्याची

 

 

 

नरेंद्र मोदी यांचा प्लॅन असू शकतो, असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे प्रवक्ते आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

 

 

 

राज्यसभेच्या खासदारांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे. कदाचित केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही लोकसभेची उमेदवारी देण्याची नरेंद्र मोदींची योजना असू शकते,

 

 

 

जर का राणे निवडणुकीच्या रिंगणात असतील, तर ते नक्कीच विजयी होतील, कारण त्यांच्याबद्दल कोकणी जनतेच्या मनात आत्मीयता आहे, असा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

 

 

 

याचा फायदा नारायण राणे यांना होऊ शकतो. ते उमेदवार असतील तर त्यांना शंभर टक्के पाठिंबा असेल, असं मत व्यक्त करताना

 

 

 

नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार असू शकतील, अशा पद्धतीचे संकेत आज शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत येथे दिले.

 

 

 

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून सध्या शिवसेनेचे विनायक राऊत खासदार आहेत. राऊत सलग दुसऱ्यांदा खासदार असून ते सध्या ठाकरे गटात आहेत.

 

 

त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महायुतीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरुन

 

 

रस्सीखेच सुरु आहे. शिवसेनेकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत. तर भाजपही या मतदारसंघासाठी आग्रही आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *