शिवसेना नाव आणि पक्ष चिन्हाबाबत मोठी अपडेट
Big update regarding Shiv Sena name and party symbol
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेची
सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सुनावणी तब्बल २५ दिवस पुढे ढकलली असून ही सुनावणी आता १५ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे.
आधी सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीसाठी २० नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती.
एकीकडे आमदार अपात्र प्रकरणी निकाल लवकर लावण्याच्या सूचना कोर्टाने दिल्या असताना ही तारीख मात्र पुन्हा पुढे ढकलली आहे.
शिवसेना नाव आणि पक्ष चिन्हावरून शिंदे आणि ठाकरे गट आग्रही असताना दोघांनीही यासाठी निवडणूक आयोगात धाव घेतली होती. त्यावेळी निवडणूक आयोगाने दोन्ही गटांचे म्हणणे ऐकल्यावर शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिलं.
यावर ठाकरे गटाने सुप्रिम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. ही सुनावणी आता पुन्हा एकदा लांबणीवर पडलेली दिसत आहे.
याआधी ११ ऑक्टोबरला ही सुनावणी झाली होती. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने सुनावणीसाठी २० नोव्हेंबर ही तारीख दिली होती.
निवडणूक आयोगाने शिंदे गटाल शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव दिले तेव्हा विधीमंडळातील आमदारांची संख्या लक्षात घेतली होती.
यासह २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीतील विजयी झालेल्या शिवसेना उमेदवारांच्या मतांची आकडेवारी ग्राह्य धरण्यात आली होती. या आकडेवारीनुसारच आयोगाने हा महत्वपूर्ण निकाल दिला होता.