चव्हाणांसोबत भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेसच्या संभाव्य आमदारांमध्ये सुरेश वरपुडकर यांच्याही नावाची चर्चा

The name of Suresh Varpudkar is also being discussed among the Congress MLAs who are joining the BJP along with Chavan ​

 

 

 

 

 

काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेससाठी ही मोठी खिंडार माणली जात आहे.

 

 

 

अशात ११ आमदारांसह अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, असंही म्हटलं जात आहे. त्यामुळे ते ११ आमदार कोणते? यावरून काही नावांची मोठी चर्चा रंगलीये.

 

 

अशोक चव्हाण यांच्यासोबत हदगाव हिमायतनगर विधानसभा मदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. नांदेड ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील.

 

 

 

तसेच नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे आणि देगलुर विधानसभेचे आमदार जितेश अंतापूरकर, परभणी पाथरीचे आमदार सुरेश वरपूडकर, पुणे भोरचे आमदार संग्राम थोपटे.

 

 

लातूर ग्रामीणचे धीगज देशमुख, लातूर शहर अमित देशमुख, पलुस कडेगाव डॉ. विश्वजीत कदम, रिसोड अमित झनक, नागपूर पश्चिम विकास ठाकरे या ११ नावांची चर्चा होत असून. हे आमदार काँग्रेसमधून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभेचे काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर हे अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात ,ते जिल्ह्यातील वरिष्ट नेते आहेत .

 

 

 

येणाऱ्या काळात अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते , त्या अनुषंगाने वरपुडकर यांनी काँग्रेस सोडली तर त्यांना मंत्रिपद आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळू शकते अशी राजकीय चर्चा सुरु आहे .

 

 

१. धुळे ग्रामीण कुणाल पाटील (काँग्रेस)

२. हदगाव माधवराव पाटील जवळकर (काँग्रेस)

३. नांदेड दक्षिण मोहन हंबर्डे (काँग्रेस)

४. देगलूर जितेश अनंतपूरकर (काँग्रेस)

 

 

 

 

५. पाथरी सुरेश वर्पूरडकर (काँग्रेस)

६. भोर संग्राम थोपटे (काँग्रेस)

७. लातूर ग्रामीण धीरज देशमुख (काँग्रेस)

 

 

 

८. लातूर शहर अमित देशमुख (काँग्रेस)

९. पलुस कडेगाव डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस)

१०. रिसोड अमित झनक (काँग्रेस)

११. नागपूर पश्चिम विकास ठाकरे (काँग्रेस

 

 

 

यांच्या नावाची चर्चा होत आहे. मात्र अद्याप या सर्व आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. तसेच या विषयावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

 

 

 

अशोक चव्हाण यांना भाजपकडून सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रीपद मिळण्याची शक्यता मिळू शकते, अशी चर्चा सुरू आहे.

 

 

 

तसेच अन्य ११ आमदारांना देखील मंत्रीपद दिले जाईल अशीही चर्चा आहे. त्यामुळे आता अशोक चव्हाण यांना मंत्रीपद की राज्यसभा उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

 

 

दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिलाय.

 

 

 

अशोक चव्हाणांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे जाऊन विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारलाय. काँग्रेस पक्ष का सोडला? याबाबतचा मोठा खुलासा अशोक चव्हाण यांनी केला आहे.

 

 

 

काँग्रेस पक्षात होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाचे काम केले आहे. येत्या दोन दिवसात मी माझी पुढची राजकीय भूमिका काय असेल हे जाहीर करेण. अद्याप मी भाजप पक्षात प्रवेश करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.

 

 

चव्हाण भाजपत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. चव्हाण दिल्लीत जाऊन भाजप प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

मात्र, अद्याप भाजप पक्षात प्रवेश करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही असा खुलासा अशोक चव्हाण केला आहे. तसेच काँग्रेसच्या कोणत्याही

 

 

 

आमदारांशी मी संपर्क साधलेला नाही किंवा कोणतेही आमदार माझ्या संपर्कात नाहीत असा खुलासा देखील अशोक चव्हाण यांनी केला आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *