मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडेची गाडी अडवली ;यावर काय म्हणाल्या पंकजा मुंडे

Maratha protesters blocked Pankaja Munde's car; what did Pankaja Munde say about this?

 

 

 

 

प्रश्नावरून मराठा आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. बीडमध्ये मराठा आंदोलकांनी काल भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा ताफा अडवला.

 

 

 

 

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून माजलगावच्या लउळ गावात पंकजा मुंडे यांचा ताफा अडवला. आम्ही तुमचे लेकरं असं म्हणत आम्हाला न्याय द्या,

 

 

 

अशी मागणी यावेळी मराठा बांधवांनी केली आहे. मराठा आंदोलक पंकजा मुंडे यांच्या गाडी समोर आले आणि त्यांनी रस्ता रोखून धरला. यामुळे काही काळासाठी तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

 

 

 

भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे आज माजलगाव तालुक्यातील लऊळ गावात प्रचारासाठी गेल्या होत्या. यावेळी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून गावातील मराठा बांधवांनी पंकजा मुंडे यांचा ताफा काही वेळ काढून धरला.

 

 

 

यावेळी पंकजा मुंडे स्वतः गाडीतून खाली उतरल्या आणि त्यांनी मराठा बांधवांच्या भावना ऐकून घेतल्या. मराठा बांधव आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये काही वेळ मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता.

 

 

 

 

तर, पंकजा मुंडे यांनी देखील मराठा बांधवांची समजूत काढत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली. भविष्यात

 

 

मराठा अरक्षणासाठी पंकजा मुंडे काय भुमिका घेणार, हे बॉण्डवर लिहून द्यावं, अशी मागणी देखील काही मराठा बांधवांनी यावेळी केली.

 

 

 

 

दरम्यान यावर बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या माझी गाडी अडवून घोषणा देणारे मराठा आंदोलनक नव्हते, हा तर प्रायोजित कार्यक्रम होता, असा हल्लाबोल भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केला.

 

 

 

 

माजलगाव तालुक्यात प्रचारासाठी गेल्यानंतर पंकजा मुंडे यांचा ताफा दोन ठिकाणी मराठा आंदोलकांनी अडवला होता. त्यांच्यासमोर तीव्र घोषणाबाजी करण्यात आली होती. यावरच पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

 

 

 

 

पंकजा मुंडे म्हणाल्या, “मागच्यावेळीही माझा ताफा अडवून अशी घोषणाबाजी करण्यात आली होती. हा प्रकार दुसऱ्यांदा झाल्याने हे मराठा आंदोलक असू शकत नाहीत. कारण आंदोलक हे चर्चा करण्यासाठी तयार असतात. त्यामुळे कालचा प्रकार हा तर प्रायोजित कार्यक्रम होता”

 

 

 

 

कोणत्याही समाजाला एकमेकांच्या अंगावर घालणाऱ्या कार्यक्रमात मी सहभागी झाले नाही. मी कोणत्याही समाजाचा द्वेष केला नाही. मराठा समाजाला कोर्टात टिकणारं आरक्षण नक्कीच मिळेल,

 

 

 

 

असा शब्द मी मराठा बांधवांना दिला आहे. मात्र हे प्रकार वारंवार घडत असल्याने मी भावूक झाले आहे, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

 

 

 

बीड जिल्ह्यात 40 उमेदवार फिरतात, मग हा अनुभव माझ्याच वाट्याला का? असा प्रश्न विचारत, हे पाहून मन छिन्न विच्छिन्न होत आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

 

 

“बीड जिल्ह्याचे सोशल फॅब्रिक जीर्ण करण्याचं मोठं षडयंत्र कोण रचतं हे माहीत नाही. मात्र यापूर्वी बीड जिल्ह्यात असं कधीच झालं नव्हतं. बीड जिल्ह्यामध्ये 40 उमेदवार फिरतात.

 

 

 

मग आरक्षणाच्या मागणीवरून हे अनुभव माझ्याच वाट्याला का येतात? मी कोणत्याच घटनेचा फायदा घेऊन कोणत्याही समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न केला नाही.

 

 

 

 

जेव्हा आरक्षणाच्या मुद्द्यावरून माझा ताफा अडवला जातो, त्यामध्ये 14,15 वर्षाची मुलं असतात हे पाहूनदेखील मन भावूक होतं.

 

 

 

 

मुलांमध्ये जातीपातीची लढाई निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. मराठा समाजाला आरक्षण नक्की मिळेल आणि बीड जिल्ह्यामध्ये जे काही प्रकार सुरू आहेत,

 

 

 

 

त्याचा मतावर जास्त परिणाम होणार नाही, राजकारणी म्हणून आम्ही त्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत, असंदेखील पंकजा मुंडे म्हणाल्या

 

 

 

आरक्षणाच्या मुद्द्यावरून बीड जिल्ह्यामध्ये ज्या काही घटना घडत आहेत, त्याचा काही राजकीय पक्ष फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

 

 

 

मनोज जरांगे पाटील यांनी गरीब मराठा बांधवांसाठी उभा केलेल्या आंदोलनावर आमचाच हक्क आहे असं काही राजकीय पक्षांना वाटतं. मात्र आपल्या आंदोलनाचा असा कोणी गैरफायदा घेऊ नये यासाठी त्यांनी सावध भूमिका घ्यायला हवी,

 

 

 

 

ज्या जिल्ह्यामध्ये आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं, तो जिल्हा शांत आहे. मात्र हे सगळं बीड जिल्ह्यामध्येच का होत आहे असा देखील प्रश्न आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *