चक्क पोलिसच बोगस अधिकारी म्हणून करीत होते वसुली ; महिलेसह तिघे पोलिसांच्या अडकले जाळ्यातIn fact, the police were doing the recovery as bogus officers; Three people, including a woman, were caught in the police net ​

चक्क पोलिसच बोगस अधिकारी म्हणून करीत होते वसुली ; महिलेसह तिघे पोलिसांच्या अडकले जाळ्यात

 

 

 

 

 

 

 

तोतया जीएसटी अधिकारी असल्याचे भासवून पटियालाच्या एका व्यापाऱ्याला मुंबई-आग्रा महामार्गावर गंडा घालण्यात आला होता. मात्र, व्यापाऱ्याने हिंमत दाखवून आझादनगर पोलिसात फिर्याद दाखल केल्यानंतर भलतेच प्रकरण चव्हाट्यावर आले.

 

 

 

 

व्यापाऱ्याला लुटणारे कोणी दुसरे तिसरे नव्हे तर चक्क पोलीसच निघाले. या घटनेचा धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सोक्षमोक्ष लावण्याचे धाडस दाखविले आहे.

 

 

 

 

परिणामी, निजामपूर येथील तैनात भ्रष्ट एएसआय बिपीन पाटील, मोहाडी पोलीस ठाण्याचा कर्मचारी इम्रान शेख आणि नाशिक येथील महिला पोलिस अधिकारी बिपिन पाटील यांची बहीण स्वाती पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

 

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पटियाला येथील व्यापारी कश्मीरसिंग हजारासिंग बाजवा यांच्या मालाचा मालट्रक पी.बी. 11 सी.झेड. 0765 हा महामार्गावर अडविण्यात आला होता.

 

 

तेव्हा लाल दिव्याच्या टाटा सुमोतून आलेल्या तोतया जीएसटी अधिकाऱ्यांनी गाडीतील मालाच्या पावत्यांमध्ये फर्मचे नाव चुकले आहे, असे सांगितली. यासाठी 12 लाख 96 हजारांच्या दंडाची मागणी केली होती.

 

 

 

अखेरीस तडजोडीअंती 1 लाख 30 हजार रूपये देण्याचे ठरले होते. ही रक्कम गुगल पे वरून बिपीन पाटील यांची नाशिक येथील त्याची बहिण स्वाती रोशन पाटील हिच्या खात्यावर वर्ग करण्यात आली होती. गोपनीयता राहावी म्हणून सर्व संभाषण व्हॉट्सअ‍ॅपद्वारे करण्यात आले होते.

 

 

 

याप्रकरणी सरदार बाजवा यांनी ४ जानेवारी रोजी आझादनगर पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या घटनेचा सखोल तपास करण्याची जबाबदारी पोलीस उपविभागीय अधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी,

 

 

 

पीआय बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपविली होती. त्यानंतर तपासासाठी विशेष पथक गठीत झाले. या पथकाने संशयीतांचे कॉल डिटेल्स धुंडाळले. अखेर तिघांपर्यंत पोहचण्यात आझादनगर पोलिसांना यश आले आहे.

 

 

बिपीन पाटील हा सध्या निजामपूर पोलिसात एएसआय पदावर कार्यरत आहे. त्याच्याकडे निजामपूर पोलीस ठाण्याचे शासकीय वाहन असून तो त्याच वाहनाद्वारे साथीदारांसह महामार्गावर जीएसटी अधिकारी बनून लूटमार करत होता.

 

 

 

पोलीस तपासात आतापर्यंत त्याने 71 लाख 33 हजार 984 रूपयांचा लूट केल्याचे समोर आले आहे. मात्र, हा आकडा कोट्यवधीच्या घरात असण्याचा अंदाज आहे. शिवाय, यात बडे मासेही अडकण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *