शरद पवारांनी सांगितले ,मंत्रिमंडळात कोण असणार? मुख्यमंत्रिपद कोणाला?

Sharad Pawar said, who will be in the cabinet? Who is the chief minister?

 

 

 

आम्हाला लोकांना विश्वास द्यायचा आहे की, आम्ही राज्याच्या हिताची जपणूक करणारा पर्याय तुम्हाला देतो आणि त्या पर्यायाचा कार्यक्रम लोकांसमोर देतो.

 

निवडणुकीत लोकांची शक्ती, पाठिंबा मिळाल्यानंतर मग मंत्रीमंडळात कोणाला घ्यायचं, काय पद द्यायचं या गोष्टी ठरवता येतील,

 

असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे स्पष्टपणे सांगणं टाळलं. शरद पवार सध्या चिपळू दौऱ्यावर आहेत.

 

देशामध्ये जयप्रकाश यांच्या सूचनेने समविचारी लोक सगळे एकत्र आले, पक्ष नंतर स्थापला. निवडणुकीला सामोरे गेले, लोकांनी शक्ती दिली , निवडून दिलं.

 

 

आणि निवडून आल्यानंतर जनता पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर मोरारजी देसाई यांची निवड केली . ज्यावेळी ते लोकांकडे मत मागायला जात होते,

 

त्यावेळी मोरारजी देसाई हे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत हे काही लोकांना सांगितलं नव्हतं, तरीही लोकांनी शक्ती दिली, ते पंतप्रधान झाले, देश चालवला असा किस्सा शरद पवार यांनी सांगितला.

 

विधानसभा निवडणुकांची अवघ्या काही दिवसांतच घोषणा होऊ शकते. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही कंबर कसून ततयारी सुरू केली आहे.

 

महायुती सरकार आणि महाविकास आघाडी दोघांनीही निवडणुकीसाठी जय्यत सुरू केली असली तरी सत्ता मिळाल्यावर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे.

 

दोघांनीही अजून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलेला नसून त्यावरून अनेक चर्चा सुरू आहेत,अंदाज बांधले जात आहेत. मविआनं मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा अशी मागणी

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी केली होती. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने त्याबाबत काहीच उत्तर न दिल्याने

 

मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे अजूनही अस्पष्ट आहे. त्यातच आजही शरद पवार यांनी मंत्रीमंडळात कोण असेल, मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा यावर भाष्य करण्यास नकार दिला.

 

तिरुपती बालाजीच्या मंदिरात मिळणाऱ्या लांडूच्या प्रसादावरुन सध्या वाद रंगला आहे. त्यासंदर्भातही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

 

‘ ते लोकांच्या श्रद्धेचं ठिकाण आहे, अनेक भाविक तिथे श्रद्धेनं जात असतात. तिथे मिळणाऱ्या प्रसादामध्ये काही मिक्स केलेलं आहे, असं मी वाचलं.

 

माझ्या हातात त्याची अधिकृत काही माहिती आलेली नाही. पण ते जर खरं असेल ते अतिशय चुकीच आहे. यासाठी जे कोणी जबाबादार असतील त्यांच्यावर सक्त कारवाई केली पाहिजे, कारण लोकांच्या भावनेशी कोणी खेळू नये, ‘ असं मत त्यांनी मांडलं.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *