रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे बक्षिस वितरण , शालेय साहित्य वाटप संपन्न
Prize distribution of coloring and painting competition, distribution of school materials completed

मराठवाडा विभागीय प्रतिनिधी/शेख रफिक
वसमत विधानसभा युवक काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष अब्दुल तोहीद अब्दुल वहीद यांच्या वाढदिवसा निमित्त वसमत शहर काॅंग्रेस कमिटीच्या वतीने सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी
17 जुलै 2024 रोजी मयुर मंगल कार्यालय वसमत येथे तालुका स्तरीय चित्र रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी 10:00 वाजता तसेच दुपारी 02 वाजता या स्पर्धेचे बक्षिस वितरण मोठ्या थाटामाटात संपन्न झाले.
या बक्षिस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष वसमत नगर परीषदचे माजी नगराध्यक्ष अब्दुल हफिज अब्दुल रहेमान उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती डाॅक्टर एम.आर.क्यातमवार प्रमुख पाहुणे म्हणुन काॅंग्रेस पक्षाचे तालुकाअध्यक्ष राजाराम खराटे,
शहराध्यक्ष शेख अलिमोद्दीन,माजी नगरसेविका अडव्होकेट सिमाताई अब्दुल हफिज,राष्ट्रवादी पक्षाच्या शहराध्यक्षा सौ.मुनिताताई जाधव,
महीला शहर काॅंग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षा सौ.तेजस्विनीताई वाघमारे,रवि बडवणे ,माजी नगरसेवक जग्गुभाऊ मोरे,यलप्पा मिटकर पी.डी.सी बॅंकचे मॅनेजर शोएब ,
जब्बारभाई,नुरुभाई, हारुणभाई दालवाले,अख्तर ,बीट जमादार गजानन भोपे साहेब,श्रीधर वाळवंटे,बापु मद्दीलवार,रघुनाथ ढवळे , रविकिरण वाघमारे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन- सुनिल मनोहरे यांनी केले.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वाजिद भाई अफजल,अरशद अफजल,शाहेद अफजल,शहेबाज अफजल, शकील अफजल,
आतिफ अफजल, अरसलान अफजल, अरबाज अफजल,शेख आवेज, राऊत चौधरी, शेख शबिल, अरविंद कठाळे,अनिल पाटोळे, यांनी परिश्रम घेतले.
रंगभरण स्पर्धेतील विजेत्यांची नावे :
पहिली ते पाचवी गटात
प्रथम बक्षिस रोख रक्कम 3000 रुपये व सन्मानचिन्ह : काव्या सचिण गुजराथी
द्वितीय बक्षिस रोख रक्कम 2000 रुपये व सन्मानचिन्ह : ईश्वरी श्रीकांत तोरेवार
तृतीय बक्षिस रोख रक्कम 1000 रुपये व सन्मानचिन्ह : इश्वरी भिवाजी साखरे
—
सहावी ते दहावी गटात
प्रथम बक्षिस 11,111 रुपये व सन्मानचिन्ह :बालाप्रसाद रमेश मिटकर
द्वितीय बक्षिस रोख रक्कम 7,777 रुपये व सन्मानचिन्ह :सक्षम विजय एंगडे
तृतीय बक्षिस रोख रक्कम 5,555 रुपये व सन्मानचिन्ह :कल्याणी केशवराव कदम ह्या विद्यार्थीनीने मिळविले तसेच उत्तेजनार्थ चार विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाचशे रुपये व प्रशस्तीपत्र देण्यात आले.
सर्व विजेत्यांना रोख बक्षिसे,सन्मानचिन्ह देवुण त्यांचा सन्मान करण्यात आला.त्यावेळी या कार्यक्रमात मान्यवरांनी मार्गदर्शन करुण सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले
या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना शालेय साहित्य व सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.उपस्थित विद्यार्थ्यांनी अश्या स्पर्धा दरवर्षी घ्याव्यात अशी विनंती अब्दुल तोहीदभाई व शहर काॅंग्रेस कमिटीकडे केली.