वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर;पाहा तुमच्या मतदारसंघात कोण उमेदवार ?
Vanchit Bahujan Aghadi candidate announced; see who is the candidate in your constituency?

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सर्वच पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. दरम्यान आता वंचितनेही
उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीने एकूण ११ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत रमेश बारसकरांचाही समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने मविआसोबत न जाता आपले स्वतःचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यास सुरुवात केली आहे.
वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. वंचितने जाहीर केलेल्या या यादीत एकूण ११ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.
या यादीत रावेरमधून संजय पंडीत ब्राम्हणे यांना उमेदवारी दिली आहे. तर जालन्यातून प्रभाकर देवमन बकले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
मुंबई उत्तर मध्यमधून अबु हसन खान हे उमेदवार आहेत. माढ्यातून रमेश नागनाथ बारसकर हे निवडणूक लढवणार आहे.
वंचितचे ११ उमेदवार
रावेर – संजय पंडीत ब्राम्हणे – बौद्ध
जालना – प्रभाकर देवमन बकले – धनगर
मुंबई उत्तर मध्य – अबु हसन खान – मुस्लीम
रत्नागिरी सिंधुदुर्ग – काका जोशी – कुणबी
हिंगोली – डॉ. बीडी चव्हाण – बंजारा
लातूर – नरिसिंहराव उदगीरकर – मातांग
सोलापूर – राहुल काशिनाथ गायकवाड – बौद्ध
माढा – रमेश नागनाथ बारसकर – माळी (लिंगायत)
सातारा – मारुती धोंडीराम जानकर – धनगर
धुळे – अब्दुर रहमान – मुस्लीम
हातकलंगणे – दादासाहेब पाटील – जैन
The Vanchit Bahujan Aaghadi is pleased to declare its second list of candidates from Maharashtra for the Lok Sabha elections. pic.twitter.com/9TFe472Byw
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) March 31, 2024