BREAKING;महाराष्ट्रातून कांग्रेस पक्षाने दिली “या “माजी मंत्र्यांना राज्यसभेची उमेदवारी
The Congress Party has given the nomination to the Rajya Sabha to "this" former minister from Maharashtra

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नावाचाही समावेश आहे. सोनिया गांधी सध्या रायबरेलीच्या लोकसभा खासदार आहेत.
राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी, अखिलेश प्रसाद सिंह, चंद्रकांत हंडोरे
आणि पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना राज्यसभेचे उमेदवार बनवण्यात आले आहे. काँग्रेसने बुधवारी राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली.
त्यानुसार पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना राजस्थानमधून, अखिलेश प्रसाद सिंग यांना बिहारमधून, अभिषेक मनू सिंघवी यांना हिमाचल प्रदेशातून आणि चंद्रकांत हंडोरे
यांना महाराष्ट्रातून पक्षाचे तिकीट देण्यात आले आहे. सोनिया गांधी यांनीही आज राजस्थानमधून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत राहुल गांधी, प्रियांका गांधी वढेरा, अशोक गेहलोत आणि गोविंद सिंग दोतासरा उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि एल मुरुगन यांना भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यसभेचे तिकीट दिले आहे आणि त्यामुळे त्यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता संपुष्टात आली आहे.
मध्य प्रदेश आणि ओडिशामधील द्विवार्षिक राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आज पाच उमेदवारांची यादी जाहीर केली,
त्यात या दोन केंद्रीय मंत्र्यांच्या नावांचा समावेश आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने या नावांना मंजुरी दिल्याचे पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगितले.
भाजपने मध्य प्रदेशातून एल मुरुगन यांना पुन्हा तिकीट दिले आहे तर इतर तीन उमेदवार नवीन आहेत. उमेशनाथ महाराज, माया नरोलिया आणि बन्सीलाल गुर्जर यांना तिकीट देण्यात आले असून
अश्विनी वैष्णव यांना ओडिशातून उमेदवारी देण्यात आली आहे. ओडिशाच्या कटक लोकसभा मतदारसंघातून भाजप वैष्णव यांना
उमेदवार बनवण्याच्या तयारीत असल्याची अटकळ होती, वैष्णवनेही तयारी सुरू केली होती. त्याचप्रमाणे तामिळनाडूत मुरुगनला मैदानात उतरवण्याचे संकेत मिळाले होते.
चंद्रकांत हांडोरे हे मुंबईमधील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. आंबेडकरी चवळवळीतही त्यांचे प्रस्थ आहे. मात्र विधानपरिषदेत त्यांना दगफटका झाला आणि ते पराभूत झाले होते. मात्र आता त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केल्याने त्यानी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहे.
अशोक चव्हाण यांच्यासोबत कोणीही जाणार नाही. पक्षश्रेष्ठी यांनी दगाफटका होणार नाही याची काळजी घेतील तर नक्की राज्यसभा निवडणूक जिंकू, असं चंद्रकांत हांडोरे यांनी म्हटलं.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आज सोनिया राजस्थानची राजधानी जयपूरला पोहोचल्या. राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही त्यांच्यासोबत होत्या.