काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्या मुलीसह ४९ नेत्यांवर कारवाई

Congress party action against 49 leaders including leader of opposition Vadettiwar's daughter

 

 

 

 

 

विदर्भातील १० जागांसाठी मतदान संपले आहे. निवडणुकीची रणधुमाळी संपताच काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे. निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार न केल्याने

 

 

 

 

 

आणि काम न केल्याने अखिल भारतीय युवक काँग्रेसने प्रदेश युवक काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार

 

 

 

आणि युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस यांच्यासह ४९ अधिकाऱ्यांना कारणे नोटीस बजावण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत ते सर्व विदर्भातील आहे.

 

 

 

निवडणुकीत काँग्रेस उमेदवारासाठी काम न केल्याने नागपूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिथिलेश कन्हेरे यांना पक्षाने पक्षातून हाकलून दिले आहे.

 

 

 

कान्हेरे रामटेक येथील लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्याम बर्वे यांचा साठी काम न केल्याने आणि प्रचारात सहभागी नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

 

 

 

 

यासोबतच गडचिरोली युवक काँग्रेसचे अध्यक्ष लॉरेन्स गेडाम यांनाही पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे.

 

 

 

पक्षाच्या नियोजित कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने शिवानी वडेट्टीवार, अभिषेक धवड, माजी नगरसेविका व युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस नेहा निकोसे,

 

 

 

 

कीर्ती आकेरे, उपाध्यक्ष तन्वीर मुताभि, सचिव आकाश हेटे, आकाश घाटोळे यांच्यासह ४९ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून उत्तरे मागितली आहे.

 

 

 

शिवानी वडेट्टीवार या स्वतः चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होत्या. पण, काँग्रेसने प्रतिभा धानोरकर यांना तिथे उमेदवारी दिली. त्यामुळे शिवानी वडेट्टीवार नाराज होत्या.

 

 

 

त्यांनी पक्षाची कामे केली नसल्याची तक्रार आहे. त्यांनी समाधानकारक खुलासा न केल्यास त्यांना युवक काँग्रेसमधून बडतर्फ केले जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *