मनोज जरांगे यांच्या आंदोलनात फूट, सहकार्याने केले गंभीर आरोप

Manoj Jarange's movement made serious allegations of cooperation with the foot ​

 

 

 

 

 

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणातील महत्त्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारसकर यांनी आज पत्रकार परिषद घेत मनोज जरांगेवर मोठे आरोप केले आहेत.

 

 

 

मनोज जरांगे रोज पलटी मारतात, खोटं बोलतात, असा गंभीर स्वरूपाचा आरोप बारसकर यांनी केला आहे.

 

 

 

यावेळी बोलताना बारसकर म्हणाले, जरांगे पाटील हेकेखोर आहेत. त्यांनी मराठ्यांना उद्ध्वस्त केलं आहे. जरांगे लोकांची फसवणूक करत आहेत. जरांगे यांना बोलताना भान राहत नाही असंही असंही बारसकर यांनी पुढे म्हटलं आहे.

 

 

 

 

मनोज जरांगे यांनी बंद खोलीत बैठका केल्या. जरांगे यांच्या बैठका रात्री होतात. त्यांनी लोकांची फसवणूक केली आहे असा आरोपही बारसकर यांनी केला आहे.

 

 

 

 

मी जरांगेंच्या प्रत्येक कृतीला साक्षीदार आहे. मी प्रसिध्दीसाठी किंवा पैशासाठी आरोप करत आहे असं नाहीये. मी कीर्तनाचे देखील पैसे घेत नाही. आताच हे का झालं? काही दिवसांपासून माझ्या मनातील खदखद व्यक्त केली.

 

 

 

मला अनेक फोन येत आहेत, गोळ्या घालून मारू. माझं काम सत्य सांगणं आहे. जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला. तो मी सहन करणार नाही. जरांगे यांना लोकं पाणी प्या म्हणत होते, तेव्हा मी त्यांना पाणी पाजायला गेलो.

 

 

 

 

मात्र तेव्हा त्यांना वाटलं माझ्या हातून पाणी प्यायल्याने, मी मोठा होईल म्हणून नाय प्यायला. मला तिथे म्हणाला संत फिंत गेले खड्यात. तिथून माझा वाद सुरु झाला, असंही बारसकर पुढे म्हणालेत.

 

 

 

 

मनोज जरांगे यांनी काही ठिकाणी गुप्त बैठका घेतल्या असल्याचंही बासरकर यांनी म्हटलं आहे. 23 डिसेंबरला गुप्त बैठक काहींसोबत केली. मी त्याचा साक्षी आहे. रांजन गाव गणपती येथे उच्च पदस्थ अधिकारी यांच्यासोबत गुप्त मीटिंग केली.

 

 

 

 

लोणावळा, वाशी येथे ही समाजाला वगळून मीटिंग केली. वाशी आंदोलन इथंवर मी आंदोलक म्हणून सहभागी होतो, मात्र त्यांच्या मीटिंगमुळे मला आक्षेप होता.

 

 

 

 

जरांगेला काडीची अक्कल नाही. पंधरा मिनिटात शासन निर्णय आणि अधिसूचना द्या म्हणे. अर्धवट ज्ञान बेक्कार असतं म्हणतो पण स्वतःचं काय. सगळ्या अधिकारी यांच्यासोबत हा मिटिंग घेत होता, असंही ते पुढे म्हणाले आहेत.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *