महाराष्ट्रातील मोठ्या नेत्याची निवडणुकीतून माघार?म्हणाले तिकीटासाठी आग्रही नाही

Is the big leader of Maharashtra withdrawing from the election? He is not insisting on the ticket

 

 

 

 

 

शिरूर लोकसभा निवडणुकीत मला तिकीट द्यावे, अशी मागणी मी अद्याप केली नाही किंवा त्याबाबत जाहीर वक्तव्य केले नाही. राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे ठरवतील तो निर्णय मला मान्य असेल.

 

 

 

 

शिरूरच्या निवडणुकीसाठी मला तिकीट मिळावे यासाठी मी आग्रही नाही, अशा शब्दांत शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गुरुवारी भूमिका स्पष्ट केली.

 

 

 

 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आल्यास त्याबाबतही पक्षप्रमुख ठरवतील तेच मान्य करू असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातून एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.

 

 

 

म्हाडाच्या पत्रकार परिषदेत राजकीय परिस्थितीबाबत विचारता त्यांनी वरील भूमिका स्पष्ट केली. ‘प्रसारमाध्यमांमधूनच ‘मी आज शिवसेनेकडे’, ‘उद्या राष्ट्रवादीकडे जाणार’ अशा बातम्या येत होत्या.

 

 

त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. त्याबाबत कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवायचीच असे स्पष्ट केले.

 

 

 

जोपर्यंत कोणत्या पक्षाकडे जागा हे निश्चित होत नाही तोपर्यंत पर्याय खुला राहील, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. परिस्थितीनुसार, निवडणूक लढवू.

 

 

 

 

त्याबाबत माझे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील ते मला मान्य असेल. निवडणूक लढविण्यासाठी मी आग्रही नाही,’असा पुनरुच्चार करत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भूमिका मांडली.

 

 

 

दोन दिवसांपूर्वी मंचर येथील कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढळराव पाटील यांच्या संस्थेला भेट दिली. यावेळी आढळराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

 

 

 

तर दुसरीकडे, आढळराव यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध सुरू झाला. याबाबत विचारता, आढळराव यांनी ‘महायुतीचा निर्णय मला मान्य असेल.

 

 

राष्ट्रवादीकडून लढविण्यास सांगितल्यास निवडणूक लढवू. राष्ट्रवादीच्या आमदारांचा आणि कार्यकर्त्यांचा विरोध का आहे हे अनाकलनीय आहे. विरोध असताना मी राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी जाणार नाही,’ अशा शब्दांत उमेदवारीबाबतही त्यांनी भाष्य केले.

 

 

 

महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवत असल्याचा गंभीर आरोप आढळराव पाटील यांनी केला होता. याबाबत पुन्हा राष्ट्रवादी सोबत जाणार का, या प्रश्नावर त्यांनी ‘आताची परिस्थिती बदलली आहे’,

 

 

 

असे स्पष्ट केले. महायुतीमध्ये कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले का या प्रश्नावर, ‘मनोमिलन आहे, म्हणूनच महायुती एकत्रित लढते आहे’, अशा शब्दांत राष्ट्रवादीशी सलगी करण्यामागचे कारण स्पष्ट केले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *