लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ;निवृत्त तहसीलदारासह पतीला अटक

Anti-corruption department action; husband arrested along with retired tehsildar

 

 

 

 

 

सेवाकाळात गैरमार्गाने तब्बल दोन कोटी ६२ लाखांहून अधिकची संपत्ती कमावल्याप्रकरणी अलिबागच्या तत्कालीन तहसीलदार अडचणीत आल्या आहेत.

 

 

 

याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मीनल दळवी, पती कृष्णा दळवी या दांपत्याला अटक केली असून न्यायालयाने सात दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

 

 

 

आईकडून वडिलोपार्जित बक्षीसपत्र स्वरूपात मिळालेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर मुलाच्या नावाची नोंद करण्यासाठी तसेच याबाबत असलेल्या

 

 

अपिलावर तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी दोन लाखांची लाच स्वीकारल्यामुळे अलिबागच्या तत्कालीन तहसीलदार मीनल दळवी

 

 

 

यांचे नोव्हेंबर २०२२ मध्ये निलंबन करण्यात आले होते. राकेश चव्हाण या खासगी व्यक्तीच्या माध्यमातून ही लाच स्वीकारण्यात आली होती.

 

 

 

नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधात्मक पथकाने दोघांना रंगेहाथ पकडले होते; तर अलिबाग पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक

 

 

अधिनियमानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या कारवाईनंतर मीनल दळवी यांच्या मालमत्तेच्या चौकशीचे आदेश दिले गेले होते.

 

 

 

त्यानुसार नवी मुंबई पोलिस उपअधीक्षक शिवराज म्हेत्रे यांच्या पथकाने तपासणी केली असता मीनल दळवी यांनी त्यांच्या सेवा

 

 

तसेच परीक्षण कालावधीत भ्रष्ट मार्गाने उत्पन्नापेक्षा अधिकची दोन कोटी ६२ लाख रक्कमेची (९८.९७ टक्के) मालमत्ता संपादित केल्याचे आढळून आले.

 

 

 

तसेच मीनल दळवी यांनी बेकायदेशीर मालमत्ता पती तसेच स्वत:च्या नावाने बाळगून अपसंपदा मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे दिसून आले.

 

 

 

त्यामुळे नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधात्मक पथकाने मीनल दळवी, पती कृष्णा दळवी यांच्याविरोधात एपीएमसी पोलिस ठाण्यात

 

 

 

भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (संशोधन २०१८) चे कलम १३ (१)(ब), १३(२), १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *