लवकरच खुशखबर; मुंबईसाठी जाणारी जनशताब्दी परभणी मार्गे हिंगोलीपर्यंत धावणारGood news soon; Janshatabdi bound for Mumbai will run to Hingoli via Parbhani
Good news soon; Janshatabdi bound for Mumbai will run to Hingoli via Parbhani
परभणी;मुंबई-जालना जनशताब्दी दैनंदिन रेल्वेला येत्या काही दिवसांत हिंगोली पर्यंत वाढवून चालविण्यात येणार असल्याची माहिती मुख्य परिचालन प्रबंधक नाग्या यांनी
मराठवाडा रेल्वे प्रवासी संघाला आश्वासन दिले आहे.सिकंदराबाद येथील मुख्य परिचालन प्रबंधक नाग्या आणि अतिरिक्त वाहतूक प्रबंधक सुरेश रेड्डी यांना रेल्वे प्रवासी महासंघाकडून
अरुण मेघराज,कादीर लाला हाश्मी, दयानन्द दीक्षित इत्यादींनी प्रत्यक्ष भेटून विभागातील रेल्वे प्रश्नांबाबत एक निवेदन दिले होते. या निवेदनात मनमाड मार्गे नांदेड-मुंबई आणि लातूर मार्गे नांदेड-पुणे दरम्यान
दोन नवीन दैनंदिन अमृत भारत एक्सप्रेस चालविण्यात यावेत, बहुप्रतीक्षित अनेक वर्षांपासून प्रलंबित संभाजीनगर-नागपूर दरम्यान नवीन दैनंदिन रेल्वे, नांदेड-संभाजीनगर दैनंदिन रेल्वेला पूर्ववत चालविणे,
नांदेड- पनवेल, नांदेड-पुणे, नागपूर-कोल्हापूर, आणीळ अमरावती-पुणे विभागातील सर्व गाड्यांचे वेग ताशी किमान 60 पर्यंत वाढवून चालवावेत, कोरोना नंतर रद्द करण्यात आलेली सर्व सवारी गाड्यांना पूर्ववत चालवावे इत्यादी मागण्यांचा समावेश होता.
निवेदनासंधर्भात मुंबई-जालना जनशताब्दी एक्सप्रेसला हिंगोली पर्यंत येत्या काही दिवसांत वाढवणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. जनशताब्दी परभणी , हिंगोलीपर्यंत आली तर याचा दोन जिल्ह्यातील प्रवाश्याना मोठा फायदा होणार आहे.